---Advertisement---

U19 World Cup 2024 । ‘नाव इतिहिसात कोरायचं आहे…’ वर्ल्डकप फायनलआधी भारतीय कर्णधार जोमात

U19 Team India
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वनडे विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. विश्वचषकाचे दोन्ही उपांत्य सामने झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामन्यात विजय मिळवून अंतिम सामना गाठला आहे. रविवारी (11 फेब्रुवारी) हा सामना खेळला जाईल. भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन याच्या म्हणण्याप्रमाणे संघ अंतिम सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावेल.

भारतीय संघ 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सगल पाचव्यांदा अंतिम सामना खेळत आहे. यावेळी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ अद्याप एकाही सामन्यात पराभूत झाला नाहीये. उपांत्य सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिका संघाला दोन विकेट्सने मात दिली आणि अंतिम सामन्यात जागा पक्की केली. अंतिम सामन्यात आता भारतीय संग ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान भारतासमोर आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार उदय सहारन याने दिलेल्या मुलाखतीत काही खास गोष्टी सांगितल्या.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत उदय सहारन म्हणाला, “हे आम्हा सर्वांचंच स्वप्न आहे की, ही स्पर्धा जिंकावी. प्रत्येक खेळाडूला केवळ एकच 19 वर्षांखालील विश्वचषक मिळतो. आम्हाला हा इतिहास पुन्हा प्रत्यक्षात उतरवायचा आहे. आम्हालाही इतिहासात आमची नावे नोंदवायची आहेत. संघ सर्वोत्तम प्रदर्शनसाठी तयारआ हे. देशवासियांनी मी हेच म्हणेल की, त्यांनी अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करत रहावे. आम्ही विश्वचषक ट्रॉफी पुन्हा मिळवण्यासाठी आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू.”

दरम्यान, उदय सहारन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जबरदस्त खेळी केली होती. भारताच्या विजयासाठी त्याने 124 चेंडूत केलेल्या 81 धावा फारच महत्वाच्या ठरली. त्याचसोबत सचिन धस याने 95 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदीतने 96 धावांची वादळी खेळी केली होती. संघ एका वेळी फारच अडचणीत होता. पण अडचणीच्या काळात या दोघांनी वाचव्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी पार पाडली. ही खेळी सामन्याच्या निकालावर परिणाम टाकणारी ठरली. (Udhay Saharan made a statement before the final match of the U-19 World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
कारकिर्दीतील 100व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वॉर्नरनेची तोडफोट फलंदाजी, टेलर-विराटच्या यादीत मिळवलं स्थान
IPL 2024 : संपूर्ण संघासमोर मागितली गंभीरने मॅक्युलमची माफी; माजी कर्णधाराने स्वता: केला गौप्यस्फोट…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---