आज युएफा चॅम्पियन्स लीगच्या ६व्या साखळी सामन्याच्या फेरीचे काही सामने झाले तर उर्वरीत सामने उद्या खेळवले जातील. आजच्या सामन्यानंतर १२ संघांनी अंतिम १६ मध्ये आपले स्थान निश्चित केले तर उर्वरीत ४ संघांचे भवितव्य उद्याच्या सामन्यांवर अवलंबून असेल.
त्या ४ संघात लीवरपूलचे स्थान जवळजवळ निश्चित आहे फक्त ते ई गटात पहिले स्थान पटकवतात का दुसऱ्या ते कळेल समजेल. आज जुवेंटस, मॅन्चेस्टर युनाएटेड, बसेल आणि एएस रोमाने अंतिम १६ मध्ये प्रवेश मिळवला. ॲटलेटिको डी मॅड्रिड पहिल्या फेरीतच बाहेर पडली, त्यांच्या गटातून रोमा आणि चेल्सीने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान अंतिम १६ मध्ये मिळवले.
आज मॅन्चेस्टर युनाएटेडने सीएसकेए माॅस्कोचा २-१ असा पराभव करत आपले पुढच्या फेरीतले स्थान निश्चित केले. पहिल्या हाफवर पूर्ण ताबा ठेवत युनाएटेडने काही गोलच्या संधी निर्माण केल्या पण त्यांन गोल करण्यात अपयश आले.
आणि हाफच्या शेवटच्या मिनिटला गोल करत सीएसकेएने ०-१ अशी बढत घेतली. दुसऱ्या हाफला युनाएटेडने लागोपाठ आक्रमण करत ६४ व्या मिनिटला पोग्बाच्या असिस्टवर लुकाकुने गोल करत युनाएटेडला १-१ ने बरोबरी साधून दिली.
अवघ्या २ मिनिट नंतर ६६ व्या मिनिटला माटाच्या असिस्टवर रॅशफोर्डने गोल करत युनाएटेडला विजयी बढत मिळवून दिली. युनाएटेड घरच्या मैदानावर ४० सामन्यांपासून अपराजित आहे. पुढील सामना त्यांचा मॅन्चेस्टर सिटी बरोबर आपल्या घरच्या मैदानावर होणार आहे.
रोमा संघाने क्वारबागचा १-० ने पराभव केला तर चेल्सीने ॲटलेटिको डी मॅड्रिड बरोबर सामना १-१ ने बरोबरीत सोडवला. या सामन्याची परिणाम त्यांच्या सी गटातील गुणतालीकेवर झाला. रोमा पहिल्या तर चेल्सीला दूसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचे नुकसान त्यांना पुढील फेरीत होऊ शकते. बार्सिलोना किंवा पीएसजी बरोबर त्यांचा सामना येऊ शकतो. तर याच गटातून ॲटलेटिको डी मॅड्रिड बोहेर पडली.
बी गटाच्या सामन्यात पीएसजीला पराभवाचे तोंड पहावे लागले. मागील ७ महिन्यांपासून अपराजित पीएसजीला या आठवड्यात सलग दुसऱ्या पराभवाचे तोंड पहावे लागले.
बायर्न मुनिचने त्यांचा ३-१ ने पराभव केला. बायर्न तर्फे राॅबर्ट लेवानडोस्कीने युरोपियन स्पर्धेतला आपला ५० वा गोल नोंदवला तर टोलीसोने २ गोल केले. पीसजीतर्फे मबाप्पेने एकमेव गोल केला. या पराभवानंतर पण त्यांच्या गटात पीएसजी पहिल्या तर बायर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इतर सामन्यांचे निकाल:-
बार्सिलोना २-० स्पोर्टिंग सीपी
बेन्फीका ०-२ बासील
सेल्टिक ०-१ ॲन्डरलचेट
ऑलिम्पियाकोस ०-२ जुवेंटस
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)