---Advertisement---

क्रिस्तियानो रोनाल्डोची कमाल पाहून स्टेडियममध्ये उपस्थित आईला अश्रू अनावर, Video तर पाहिलाच पाहिजे

---Advertisement---

युरो नेशन लीगचे सामने सुरू आहेत. पोर्तुगल विरुद्ध स्वित्झर्लंड या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डो चांगलाच फॉर्ममध्ये दिसला आहे. हा सामना पोर्तुगलने ४-० अशा मोठ्या फरकाने जिंकला आहे. पोर्तुगलचा हा पहिलाच विजय असून त्यांनी मागच्या सामन्यात स्पेन विरुद्ध १-१ अशी बरोबरी केली होती.

या सामन्यात मॅनचेस्टर युनायटेडचा स्टार फुलबॉलपटू रोनाल्डोने २ गोल करत चमकदार कामगिरी आहे. यावेळी त्याने पहिला गोल केल्यावर कॅमेरा त्याच्या आईकडे वळला. यामध्ये डोलारस एविरो आनंदाश्रू पुसत टाळ्या वाजवून मुलाचे कौतुक करताना दिसल्या. हा व्हिडिओ एका चाहत्याने ट्वीट केला असून तो व्हायरल झाला आहे.

या सामन्यात विलियम कारवाल्होने १५व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगलला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. रोनाल्डोने ३५व्या मिनिटाला दिएगो जोटाच्या असिस्टवर गोल करत संघाला २-० असे पुढे नेले.

आक्रमकपणे खेळणाऱ्या रोनाल्डोने चार मिनिटाच्या अंतरामध्येच या सामन्यातील त्याचा दुसरा गोलही केला. ६८व्या मिनिटाला जाओ कॅन्सलोने बेर्नोर्डो सिल्व्हाच्या असिस्टवर गोल करत संघाचा विजय पक्का केला. या सामन्यात स्वित्झर्लंडला युरो२०२०मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या गोलकिपर यान सोमरची कमी जाणवली असेलच.

रोनाल्डोने या सामन्यात दोन गोल केल्याने त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ११८ गोल झाले आहेत. तसेच, सार्वकालिन गोल करणाऱ्या फुटबॉलपटूमध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे.

पोर्तुगलचा पुढील सामना १० जूनला झेक रिपब्लिक विरुद्ध होणार आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

सहज विजयासह सिटी एफसी पुणे सुपर ८ मध्ये

घोरपडी युनायटेडची आगेकूच कायम; अस्पायर गुणतक्त्यात अव्वल

महेकच्या हॅट्रिकसह कमांडोजचा केशव माधव प्रतिष्ठानवर ६-०ने दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---