किगीली शहरात सध्या क्विबुका महिला ट्वेंटी -20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(20 जून) युगांडा महिला विरुद्ध माली महिला संघात सामना पार पडला. या टी20 सामन्यात युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या निर्णयाला योग्य ठरवत युगांडा संघाने 20 षटकात 2 बाद 314 धावा केल्या. टी20 क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. युगांडाकडून सलामीला फलंदाजीला आलेली प्रॉस्कोव्हिया आलाकोने आणि कर्णधार रिता मुसामालीने शतकी खेळी केल्या. आलाकोने 116 आणि रिताने नाबाद 103 धावा केल्या. आलोको या सामन्यात धावबाद झाली.
त्याचबरोबर या सामन्यात तब्बल 61 धावा माली संघाने जादाच्या दिल्या. यामध्ये 30 नो बॉल, 28 वाईड आणि 3 बाईजच्या धावा आहेत. विशेष म्हणजे या सामन्यात केवळ 1 षटकार मारण्यात आला. हा षटकार युगांडाकडून 18 चेंडूत 34 धावा करणाऱ्या इमॅक्युलेट निकीसुयूने मारला. तसेच माली संघाकडून फक्त आयका कोनला 1 विकेट घेण्यात यश आले.
त्यानंतर तब्बल 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या माली संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. माली संघ केवळ 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे युगांडा संघाने तब्बल 304 धावांनी विजय मिळवला. हा टी20 क्रिकेटमधील धावांच्या तुलनेतील सर्वोत मोठा विजय आहे.
माली संघाकडून केवळ सरंतो काग्नास्सी(1), मरियम सामक(1), टेनिन कोनेट(4) आणि माला डीजेगुइबा(1) यांना धावा करण्यात यश आले. अन्य सर्वजणी शून्य धावेवर बाद झाले. युगांडाकडून मिल्ड्रेड ऍनिगोने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
या स्पर्धेत माली संघ सातत्याने संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यांनी 18, 19, आणि 20 जूनला खेळलेल्या सलग तीन सामन्यात अनुक्रमे 6, 11 आणि 10 धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असा पराक्रम करणारा हाशिम अमला ठरला विराट कोहलीनंतरचा दुसरा क्रिकेटपटू
–केवळ तीन दिवसांपूर्वी रोहित शर्माने केलेला तो विक्रम आता झाला विलियम्सनच्या नावावर
–शिखर धवनने विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दिला भावनिक संदेश, पहा व्हिडिओ