ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व उल्हासनगर महानगरपालिका यांच्या सौजन्याने प्रथमच “उल्हासनगर महापौर कबड्डी चषक” स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. मा महापौर यांच्या संकल्पनेतून दिनांक २१ जानेवारी ते २३ जानेवारी २०२० या कालावधीत ठाणे जिल्हास्तरीय महापौर कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, व्हि.टी.सी. उल्हासनगर -४ येथे स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजता खासदर मा.डॉ. श्रीकांतजी शिंदे व उल्हासनगरच्या महापौर श्रीमती लिलाबाई लक्ष्मण आशान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याप्रसंगी उपमहापौर श्री भगवान भालेराव, आयुक्त श्री सुधाकर देखमुख हे उपस्थित राहणार आहेत. महिला गटात किल्ले माहुली शहापूर विरुद्ध श्री समर्थ क्रीडा मंडळ कल्याण तर पुरुष गटात एकता क्रीडा मंडळ उल्हासनगर विरुद्ध राहुल क्रीडा मंडळ कल्याण या दोन सामन्यांनी स्पर्धेचं उद्घाटन होईल.
उल्हासनगरमध्ये प्रथमच ठाणे जिल्हास्तरीय पुरुष ‘अ’ गट व महिला गटाच्या भव्य मँटवरील “महापौर चषक” कबड्डी स्पर्धा होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मोरया क्रीडा मंडळ सोनाळे, ओम कबड्डी संघ कल्याण, हुतात्मा शांताराम, कालवर, आत्माराम क्रीडा मंडळ डोंबिवली, मावळी मंडळ ठाणे आदी नामवंत पुरुष संघ सहभागी होत आहेत. तर महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे, ज्ञानशक्ती क्रीडा मंडळ कल्याण, जय बजरंग वाशीद, संकल्प क्रीडा मंडळ ठाणे आदी नामवंत संघ सहभागी होणार आहेत. सर्व सामने बादपद्घतीने खेळण्यात येतील.
स्पर्धेला मंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच खासदर मा.डॉ. श्रीकांतजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच गोपाळजी लांडगे, चंद्रकांतजी बोडारे, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथचे आमदार व नगराध्यक्ष, उल्हासनगर महानगरपालिकेचे गटनेते, नगरसेवक, कबड्डी संघटक, राष्ट्रीय खेळाडु आदी मान्यवर उपस्थित राहतील असे श्री संतोष देहेरकर (उपायुक्त उ. म. पा) यांनी सांगितले.