Loading...

टीम इंडियाचा सलामीवीर वापरतोय पिंपरी चिंचडवडची गाडी

भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या केएलआर ब्रँडच्या जाहिरातीचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की एका क्षणी राहुल एक पिवळ्या रंगाची कार चालवत आहे.

विशेष म्हणजे या कारचा आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक एमएच 14 असा असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते. एमएच 14 हा महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड प्रभागाचा आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक आहे.

राहुल सध्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे चर्चेत आहे. त्याने नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेत संघाच्या गरजेनुसार तिसऱ्या, पाचव्या आणि सलामीला फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली. तसेच त्याने भारताचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुखापतग्रस्त झाल्याने यष्टीरक्षणाचीही जबाबदारीही चांगल्याप्रकारे पार पाडली.

आता तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज झाला असून 24 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

Loading...
You might also like
Loading...