मॅच फिक्सिंगशी निगडीत माहिती लपविण्यामुळे ३ वर्षांची बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलबद्दल आश्चर्यचकीत करणारा खुलासा झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, अकमलने शिस्त समितीसमोर संशयित सट्टेबाजांबरोबर केलेल्या २ बैठकींची माहिती देण्यास नकार दिला होता. यानंतर अकमलला ३ वर्षांच्या बंदीची शिक्षा दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकमलने लाहोरमधील डिफेंस हाऊसिंग सोसायटीमध्ये २ अनोळखी व्यक्तींशी बैठक केली होती. पीसीबीच्या (PCB) विश्वसनीय सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, अकमलने दावा केला की ते दोन व्यक्ती त्याच्याशी डिफेंस हाऊसिंग सोसायटीमध्ये त्याच्या मित्राच्या पार्टीमध्ये भेटले होते. परंतु त्याने भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्यांनी त्या दरम्यान झालेल्या चर्चेबद्दल सांगण्यास नकार दिला.
सूत्रांनी सांगितले की, “जेव्हा भ्रष्टाचार (Corruption) विरोधी अधिकाऱ्यांनी कराचीमध्ये १९ आणि २० फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यानची माहिती अकमलला (Umar Akmal) विचारली असता, त्याने या बैठकीची माहिती न देता स्विकार केले की त्याने चूकी केली आहे. परंतु कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.”
पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेनुसार अकमल २ आरोपांचा दोषी ठरला आणि २७ एप्रिलला त्याच्यावर १९ फेब्रुवारी २०२३पर्यंत क्रिकेटशी संबंधित सर्व गोष्टींवर बंदी घातली.
अकमलकडे एकसोबत चालणाऱ्या ३ वर्षांच्या बंदीविरुद्ध अपील करण्यासाठी १४ दिवसांचा वेळ आहे. याप्रकरणी त्याने काही वकिलांशी सल्लामसलत सुरू केली असून अपील दाखल करणार असल्याचे अकमलच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले आहे.
अकमलने दावा केला होता की, तो याप्रकणामध्ये दोषी नाही. तो पार्टीमध्ये अनेक लोकांशी चर्चा करतो, अनेक लोक त्याच्याबरोबर फोटो घेतात. परंतु तो सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही.
अकमलने पाकिस्तान संघाकडून आतापर्यंत १६ कसोटी सामने, १२१ वनडे सामने आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १००३, वनडेत ३१९४ आणि टी२०त १६९० धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकाच शहरात विराट व रोहित वेगळे सामने खेळत असतील तर कैफ ‘या’ खेळाडूचा सामना पाहणार
-ना विराट; ना रोहित, जोफ्रा आर्चरला भिती वाटते या भारतीय फलंदाजाची
-शोएब अख्तर मारणार होता हरभजन सिंगला, भज्जीच्या हाॅटेल रुममध्ये..






