आपण आतापर्यंत क्रिकेट जगतामध्ये अशा अनेक घटना पाहिल्या आहेत, ज्यामध्ये वस्तू चोरीला जात असतात. परंतु एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामध्ये खेळाडूची पत्नीच चोरी करताना पकडली गेली आहे.
पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज उमर अकमलच्या (Umar Akmal) पत्नीचे नाव नूर अम्ना आहे. नूर ही पाकिस्तानचे दिग्गज फिरकीपटू गोलंदाज अब्दुल कादिर यांची मुलगी आहे. मागील वर्षी पीएसएलच्या अंतिम सामन्यादरम्यान नूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, अकमलच्या पत्नीने खेळाडूंच्या डायनिंग रूममध्ये जाऊन जेवण चोरले आहे.
नूर एका पॉलिथीन पिशवीमध्ये जेवण भरताना दिसली होती. तसेच ती यात आपल्या जॅकेटमधून पाॅलिथीनच्या पिशव्या घेऊन आलेलीही दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तसेच तिला यासाठी खूप ट्रोल करण्यात आले होते.
https://twitter.com/TheZaiduLeaks/status/1107555170748125184?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1107555170748125184&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-umar-akmal-wife-noor-amna-caught-stealing-food-during-psl-final-3057994.html
अकमलला सोमवारी (२७ एप्रिल) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ३ वर्षांसाठी बंदी घातली आहे. अकमलला सट्टेबाजी करणाऱ्यांनी संपर्क साधल्याची माहिती लपविल्याबद्दल दोशी ठरवले आहे.
अकमलशी मागील वर्षी पीएसएलदरम्यान (Pakistan Super League) काही सट्टेबाजांनी संपर्क साधला होता. ही माहिती त्याने पीसीबीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नव्हती. त्यामुळे त्याला याचा फटका बसला आहे. अकमलच्या संपूर्ण परिवारात त्याचा भाऊ कामरान अकमलसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
अकमलची संपूर्ण कारकीर्द वादांनी भरलेली आहे. २०१५मध्ये त्याला इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिका खेळण्यापासून रोखले होते. तसेच २०१६मध्ये त्याला शिस्त न पाळल्याच्या आरोपाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिका खेळण्यावरही बंदी घातली होती. त्यानंत मे २०१६ आणि २०१७मध्येही अकमलबरोबर अशीच घटना घडली होती.
सप्टेंबर २०१७मध्ये त्याला प्रशिक्षक मिकी आर्थरबरोबर वाईट वर्तणूक केल्यामुळे बंदी घातली होती. तसेच जून २०१८मध्ये त्याने मॅच फिक्सिंगमधून (Match Fixing) मिळालेल्या गोष्टी मान्य केल्यावर पीसीबीने त्याला समन्स बजावलं होतं.
इतकेच नव्हे तर एप्रिल २०१९मध्ये त्याने दुबईमध्ये संघाचा कर्फ्यू तोडला होता. त्यामुळे त्याच्यावर दंड आकारला होता. तर २०२०मध्ये त्याने फीटनेस टेस्ट दरम्यान ट्रेनरबरोबर गैरवर्तणूक केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…
-मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’
-विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं