---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी बीसीसीआयने आखली नवी योजना; ‘त्या’दोघांना मिळू शकते जबाबदारी

On: गुरूवार, नोव्हेंबर 17, 2022 11:07 PM
india-test-team
---Advertisement---

पुढील महिन्यात भारतीय संघाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ कसोटी व वनडे मालिका खेळेल. या मालिकांसाठी भारतीय संघाची संघनिवड झालेली आहे. मात्र, या दौऱ्याआधी इंडिया ए संघदेखील बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या इंडिया ए संघामध्ये अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा व वरिष्ठ वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना संधी दिली जाऊ शकते. या संघाची संघनिवड शुक्रवारी (18 नोव्हेंबर) होण्याची शक्यता आहे.

एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चेतेश्वर पुजारा व उमेश यादव यांना इंडिया ए संघासह बांगलादेश दौऱ्यावर पाठवले जाऊ शकतात. मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात या दोघांचा समावेश आहे. बांगलादेश मधील परिस्थितीचा अंदाज यावा याकरिता बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकते. कसोटी संघातील राखीव यष्टीरक्षक असलेला केएस भरत हा देखील या दौऱ्यावर जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा हे ऑस्ट्रेलियावरून परतल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल.

भारतीय संघ या दौऱ्यावर सुरुवातीला तीन वनडे सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.‌ या मालिकेला 4 डिसेंबरपासून सुरुवात होईल.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

(Umesh Yadav And Cheteshwar Pujara Will Play For india A In Bangladesh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूला डावलणे सीएसकेला महागात पडणार! विजय हजारे ट्रॉफीत कुटले सलग तिसरे शतक
उत्तराखंडमधील नीब करोरी बाबाच्या दर्शनाला पोहोचला विराट, चाहत्यांसोबतचे फोटो व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---