सध्या इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा खेळली जात आहे. सर्व काउंटी संघ यात सहभागी झालेत. यावर्षी भारताचे पाच खेळाडू विविध संघांसाठी खेळत आहेत. हे सर्वच खेळाडू आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करताना दिसत आहेत. त्यापैकी एक असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याने पहिल्या पाच सामन्यात अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी करत विरोधी फलंदाजांना नामोहरम केले आहे.
भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज असलेला उमेश यादवला यावर्षी मिडलसेक्स काउंटीने करारबद्ध केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उमेशने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये तो भलत्याच फॉर्ममध्ये दिसून आला. सॉमरसेटविरूद्ध ५८ धावात २ बळी घेत त्याने घेतले. त्याआधी नॉटिंगहॅमशायरविरुद्ध ५४ धावांत ४ आणि सरेविरूद्ध ५२ धावात तीन बळी त्याने आपल्या नावे केले. डरहॅमविरूद्ध झालेल्या हंगामातील पहिल्या सामन्यात त्याने यापेक्षा सरस कामगिरी करत ३३ धावा देऊन विरोधी संघाचे निम्मे फलंदाज तंबूत धाडलेले.
त्याची आत्तापर्यंतच्या पाच सामन्यातील एकत्रित कामगिरी पाहिल्यास त्याने १७.१३ च्या सरासरीने आणि ५.५ अशा मामुली इकॉनॉमि रेटने सर्वाधिक १५ बळी टिपले आहेत.
उमेश व्यतिरिक्त इतर भारतीय खेळाडू देखील या स्पर्धेत चमकत आहेत. भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने मागील दोन्ही सामन्यात शतकी खेळा साकारल्या आहेत. अष्टपैलू कृणाल पांड्या हा देखील गोलंदाजीत वॉर्विकशायर संघासाठी चांगले योगदान देतोय. नवदीप सैनी व वॉशिंग्टन सुंदर हे देखील आपआपल्या संघासाठी दमदार कामगिरी करताना दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आमची भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाशी बरोबरीच होऊ शकत नाही’, खुद्द दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे भाष्य
‘सचिन तेंडूलकरला मी ओळखतच नव्हतो!’, शोएब अख्तरचा आणखी एक अजब दावा
शॉकिंग! मुंबई इंडियन्सच्या संघ मालकाला पुढील ३ तासांत संपवण्याची धमकी