---Advertisement---

उमेश एक्सप्रेस सुसाट! पंजाबची वाताहत करत केली अव्वल दर्जाची कामगिरी

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 10:00 PM
umesh kkr
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल २०२२) आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKRvPBKS) या संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघ १८.२ षटकात १३७ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये असलेल्य केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याने या सामन्यात पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली.

उमेशची पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी

प्रथम गोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर कोलकाता संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी उमेश यादव आला. त्याने पहिल्याच ओवरच्या अखेरच्या चेंडूवर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल याला तंबूचा रस्ता उमेशने सलग तिसऱ्या सामन्यातील पहिल्या षटकात बळी मिळवला आहे. त्यानंतर नवव्या षटकात त्याने मोठ्या खेळीच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या लियाम लिव्हिंगस्टोन याला तंबूचा रस्ता दाखवला. पंधराव्या शतकात पुन्हा एकदा गोलंदाजीला आल्यावर हरप्रीत ब्रार  व राहुल चहर यांना दोन चेंडूचा अंतराने बाद केले.

आजवरची सर्वोत्तम कामगिरी

उमेश यादवने या सामन्यात चार षटके गोलंदाजी करताना २३ धावा देऊन चार बळी‌ मिळवले. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी त्याने २०१२ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध २४ धावा देऊन चार बळी घेतले होते. उमेश या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिल्या सामन्यात २० धावा देत २ बळी टिपलेले. त्यानंतर आरसीबी विरुद्ध दोन बळी मिळवताना केवळ १६ धावा खर्च केलेल्या.

पंजाबचा डाव गडगडला

उमेश यादव, टीम साऊदी व आंद्रे रसेल या गोलंदाजां पुढे पंजाबचा डाव गडगडला. त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या १३७ धावांवर सर्वबाद झाला. पंजाबसाठी भानुका राजपक्षे याने सर्वाधिक ३१ धावा काढल्या.

महत्वाच्या बातम्या-

राजस्थान संघाने चँपियन शेन वॉर्नची काढली आठवण, पदार्पणवीरांना डेब्यू कॅप देताना केली खास अपील (mahasports.in)

धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---