कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला आयपीएल २०२२चा ४१वा सामना रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील संघाने ४ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात कोलकाताकडून अनुभवी ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादव याने दमदार गोलंदाजी प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात दिल्लीच्या ३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान एक मोठा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
कोलकाताच्या १४७ धावांच्या आव्हानाचा (KKR vs DC) बचाव करताना उमेशने (Umesh Yadav) पहिल्याच चेंडूवर दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) झेलबाद केले. यासह तो महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) क्लबमध्ये सामील झाला (Umesh Yadav Equals Malinga) आहे.
उमेशने तिसऱ्यांदा आयपीएल डावातील पहिल्या चेंडूवर (Wicket On First Ball Of Inning) विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. यापूर्वी मलिंगा, अशोक दिंडा आणि प्रविण कुमार यांनी प्रत्येकी ३ वेळा हा पराक्रम केला होता. आता दिल्लीच्या सलामीवीराची पहिल्या चेंडूवर विकेट घेत उमेश या यादीत सहभागी झाला आहे.
उमेशकडे इतिहास रचण्याची संधी
विशेष म्हणजे, ३ वेळा डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणाऱ्या उमेशकडे नवा विक्रम करण्याची संधी आहे. आतापर्यंत कोणताही गोलंदाज ४ वेळा हा पराक्रम करू शकलेला नाही. अशात कुलदीप हंगामातील उर्वरित सामन्यांमध्ये हा पराक्रम करत इतिसाहासाला गवसणी घालू शकतो.
९ गोलंदाजांनी २-२ वेळा केलाय हा कारनामा
आयपीएल इतिहासात आतापर्यंत ९ गोलंदाज असे होऊन गेले आहेत, ज्यांनी २ वेळा कोणत्या डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे. या यादीत ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, एल्बी मोर्केल, डर्क नानेस आणि इरफान पठाण यांचा समावेश आहे. तसेच अंकित शर्मा व जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी एक वेळा हे काम केले आहे.
केवळ २ फिरकीपटूंना पहिल्या चेंडूवर घेतला आलीय विकेट
डावातील पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्यात वेगवान गोलंदाजांचा बोलबाला आहे. परंतु केवळ २ फिरकीपटूंना हे काम करता आले आहे. ऑफ स्पिनर हरभजन सिंग आणि लेफ्ट आर्म स्पिनर अंकित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे. हरभजनने २ वेळा तर अंकितने १ वेळा डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला नाही माहिती, त्याच्या डोक्यात काय सुरुये’, खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटवर भडकला ‘दादा?’
चार विकेट्स घेऊनही पंतने कुलदीपला का दिले नाही त्याच्या हक्काचे चौथे षटक? स्वत:च सांगितले कारण






