भारतीय संघ सध्या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्तम संघापैकी एक संघ आहे. गेल्या पाच वर्षांपासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. नुकत्याच पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत देखील भारतीय संघाचा दबदबा होता. या यशामागे फलंदाजांसह गोलंदाजांनी ही तितकीच मोलाची भूमिका बजावली आहे. या संघात ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत, जे आणखी काही वर्ष भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देऊ शकतात. परंतु या गोलंदाजांमध्ये असा ही एक गोलंदाज आहे, ज्याला गेल्या तीन वर्षांपासून मोजकीच संधी मिळाली आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने गेल्या वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु, त्याला गेल्या काही महिन्यांपासून, काहीना काही कारणास्तव प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान दिले जात नाही. २०१८ सालापासून उमेशने केवळ १२ कसोटी सामने खेळले आहेत. या १२ सामन्यात त्याने ४९ विकेट्स घेतल्या आहेत. (Umesh Yadav part of Indian pace quartet fading away from Virat Kohli led team India)
उमेश यादवने अनेकदा तक्रार केली आहे की, त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याच्या वाटेवर आहे. तसेच खेळण्याची ही खूप कमी संधी मिळत आहे. त्याला काउंटी क्रिकेट खेळण्याची देखील ऑफर मिळाली होती. परंतु बीसीसीआयने वर्कलोड व्यावस्थापणाचा हवाला देत त्याचे जाणे टाळले होते. तसेच त्याला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत देखील खेळण्याची संधी मिळत नाही. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होता. आता सध्या तो दिल्ली कॅपीटल्स संघात आहे. या संघातील इतर गोलंदाज चांगली कामगिरी करत असल्यामुळे त्याला संधीची वाटच पाहावी लागत आहे.
महत्वाची बाब म्हणजे वेगवान गोलंदाजांना समर्थन करणारा कर्णधार विराट कोहली, उमेश यादवला कुठ्ल्याही प्रकारचे समर्थन करताना दिसून येत नाही. उमेशने भारतीय संघासाठी २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे झालेला दिवस-रात्र कसोटी सामना देखील खेळला होता. या सामन्यात त्याने ८ गडी बाद केले होते. तसेच फलंदाजी करताना काही महत्वपूर्ण धावा देखील केल्या होत्या.
परंतु, २०२० मध्ये जेव्हा भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा उमेश यादवला एकमात्र कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. तसेच ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ दौऱ्यातही तो दोनच सामन्यात खेळला आणि दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला. आगामी इंग्लंड दौऱ्यावरही त्याला प्लेइंग इलेव्हेनमध्ये संधी मिळण्याची खूप कमी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
ओहो… क्या बात है! पराभवाची पर्वा न करत किंग कोहली अनुष्कासोबत लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद
अजबच! WTC फायनलचं टेंशन घेऊन चक्क बाथरुममध्ये लपला होता जेमिसन, वाचा मजेदार किस्सा
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला