जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडच्या हातून 8 विकेटने पराभव पत्कारावा लागला. राखीव दिवसावर गेलेल्या या सामन्याच्या शेवटच्या डावात कर्णधार केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी महत्त्वपुर्ण भागिदारी करत संघाला जेतेपद मिळवून दिले. यानंतर नुकताच या ऐतिहासिक सामन्यातील विजयाचा नायक ठरलेला न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याने एक मोठा खुलासा केला आहे.
भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यातील शेवटचे काही तास खूप अवघड होते. या सामन्यानंतर सामन्याच्या दबावापासून आणि जल्लोषापासून वाचण्यासाठी तो बाथरूममध्ये जाऊन लपला असल्याचे त्याने सांगितले आहे.
भारताकडून केवळ 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 44 धावांत 2 बळी गमावले होते. अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघातील खेळाडूंवर दबाव निर्माण होत होता. पण न्यूझीलंडचे दोन अनुभवी फलंदाज रॉस टेलर आणि कर्णधार केन विलियम्सन यांनी 96 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
जेमिसनने ‘कंट्री स्पोर्ट ब्रेकफास्ट ऑन गोल्ड एम’ला सांगितले की, “हे पाहणे खूप अवघड होते. सामन्यादरम्यान मी बऱ्याचदा बाथरूमला जाण्याचा खूप प्रयत्न केला. कारण तिथे कोणताही आवाज नव्हता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी मी सर्वांपासून थोडा वेळ दूर गेलो होतो. कारण मी खूप नर्वस झालो होतो. केन आणि रॉस मैदानावर होते. आमचे दोन दिग्गज फलंदाज अतिशय शांत होते आणि त्यांनी आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडली.”
जेमिसन पुढे म्हणाला की, “असे क्षण पाहणे आणि त्याचाच एक भाग होणे हे कदाचित कसोटी क्रिकेटमधील सर्वात कठीण क्षण होते. आम्ही एका कोपऱ्यात बसून टीव्ही पाहात होतो. प्रत्येक चेंडूवर भारतीय प्रेक्षक उभे असल्याचे दिसते होते. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो आणि तिथेच आम्ही आमचा सर्व वेळ घालवला. हे खूप छान होते, एकत्र बसून वेळ घालवला आणि काही वर्षांच्या मेहनत आणि मोठ्या दौऱ्यानंतर एकत्र या गोष्टीचा आनंद लुटला. मागे बसून एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेणे खूप छान होते.’
साऊथॅम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात काइल जेमिसनने ७ गडी बाद केले. यात पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन बळींचा समावेश होता. यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला. विशेष गोष्ट म्हणजे त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला दोन्ही डावांमध्ये बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला
अश्विन-मितालीला मिळाले खेलरत्न पुरस्काराचे नामांकन, अर्जुन अवॉर्डसाठी ‘या’ ३ नावांची शिफारस
शम्सीच्या गोलंदाजीपुढे विंडीजचा संघ हतबल, दक्षिण आफ्रिकाचा रोमांचक लढतीत १ धावेने विजय






