---Advertisement---

ब्रिस्बेन कसोटीत वेगवान बाउंसर टाकल्याने शार्दुलला चेतावणी देणाऱ्या अंपायरची निवृत्ती, ‘अशी’ राहिली कारकिर्द

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. २०१२ पासून आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलचे नियमित सदस्य असलेले ऑक्सनफर्ड यांनी १०६ वनडे, ६३ कसोटी, ३१ टी२० सामन्यात पंचाची भूमिका साकारली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ब्रिस्बेन कसोटी सामना त्यांचा पंचगिरी करण्याचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यादरम्यान त्यांनी भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूर याला चेतावणी दिल्याने त्यांची चर्चा झाली होती.

वेगवान बाउंसर टाकल्याने दिली होती चेतावणी

ही घटना ब्रिस्बेन कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ७५व्या षटकात घडली होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. अशात युवा गोलंदाज शार्दुल डावातील ७५वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने षटकातील तिसरा चेंडू १२१ किमी दर ताशी वेगाने टाकला. यावर फलंदाजी करत असलेला कमिन्स धाव घेऊ शकला नाही.

त्यानंतर शार्दुलने पुढे १३३ किमी दर ताशी वेगाने बाउंसर टाकला. हे पाहून सामना पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी शार्दुलला तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने चेतावणी दिली होती आणि हळूवार गोलंदाजी करण्यास सांगितले होते. तसेच त्यांनी शार्दुलचा तो चेंडू वाईड बॉल असल्याचेही घोषित केले. पंच ऑक्सफर्ड यांच्या या हरकतीनंतर भारतीय क्रिकेट रसिक चांगलेच भडकले होते.

वनडे, टी२० विश्वचषकात केली होती पंचगिरी

ऑक्सनफर्ड यांनी जानेवारी २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी२० सामन्याने त्यांच्या पंच कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यांनी मागील ३ वनडे आणि टी२० विश्वचषकात पंचगिरी केली आहे. सोबतच २०१२ आणि २०१४ सालच्या महिला टी२० विश्वचषक सामन्यांचेही ते पंच होते. जरी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला रामराम ठोकला असला; तरी ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंचाच्या भूमिकेत दिसतील.

ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी सर्वांचे व्यक्त केले आभार

ऑक्सनफर्ड यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयसीसीशी बोलताना म्हटले की, “मी एका पंचाच्या रुपात माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अभिमानास्पद समजतो. मला विश्वासच नाही होत की, मी २००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. मी एवढ्या मोठ्या कारकिर्दीची अपेक्षा केली नव्हता.”

“मी आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी एलिट तथा आंतरराष्ट्रीय पॅनलच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी एवढे वर्षे मला प्रोत्साहित केले आहे. खासकरून क्रिकेटमुळे मला भेटलेल्या काही शानदार व्यक्तींना पाहणे, त्यांच्याशी चर्चा करणे या सर्व गोष्टींची खूप आठवण येईल”, असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले.

तसेच शेवटी आपल्या कुटुबांचे आभार व्यक्त करत ते म्हणाले की, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माझी पत्नी जो, मुलगा जेम्स आणि मुलगी क्रिस्टन यांचे माझ्यावरील प्रेम आणि समर्थनासाठी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो. त्यांच्या त्यागामुळे मला एवढी मोठी कारकिर्द पूर्ण करण्यात मदत मिळाली आणि यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी असेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ‘या’ पठ्ठ्याने जिंकल मुंबई इंडियन्सचं मन, गाजवणार आयपीएल २०२१चा हंगाम ?

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---