जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आणि बेन स्टोक्सने पहिल्यांदा या पदाची जबाबदीर घेतली. न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना सध्या रोमांचक वळणावर आला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक आश्चर्यकारक प्रसंग मैदानात घडला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला पंचांना त्रिफळाचीत बाद दिले होते, पण नंतर पंचांनीच त्याला पुन्हा खेळपट्टीवर बोलावले.
बेन स्टोक्स (Ben Stokes) न्यूझीलंडच्या कॉलिन डी ग्रॅडहोम (Colin de Grandhome) याच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला होता आणि पव्हेलियनच्या दिशेने चालला देखील होता, पण तितक्यात समजले की, हा चेंडू नो बॉल होता आणि पंचांनी स्टोक्सला पुन्हा खेळपट्टीवर बोलावले. हा प्रसंग सामन्याच्या शेवटच्या डावातील २७ व्या षटकात पाहायला मिळाला. २६.३ षटकात इंग्लंडने ४ विकेट्सच्या नुकसानावर ७६ धावा केल्या होत्या. षटकातली चौथा चेंडू टाकताच तो स्टोक्सच्या बॅटच्या खालच्या बाजूला लागला आणि स्टंप्समध्ये घुसला. चेंडू स्टंप्सला लागून बेल्स खाली पडल्या आणि पंचांनी त्याला बाद घोषित केले. परंतु नंतर चेंडू नो बॉल असल्याचे समजल्यावर मात्र पंचांना स्वतःचा निर्णय बदलावा लागला.
दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ 1st Test) संघातील या सामन्याचा विचार केला, तर पहिल्या डावात गोलंदाजांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अवघ्या १३२ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या फलंदाजांनी देखील झटपट विकेट्स गमावल्या आणि १४१ धावांवर त्यांचा संघ सर्वबाद झाला.
दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडने २८५ धावांचे मोठे लक्ष्य उभे केले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी देखील चांगले प्रदर्शन केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ५ विकेट्सच्या नुकसानावर २१६ धावा केल्या होत्या. त्यांना विजयासाठी ६१ धावांची गरज होती. मात्र, पुढे इंग्लंडने हा सामना ५ विकेट्सने जिंकला. माजी कर्णधार जो रूट याने नाबाद ११५ धावांची खेळी केली. तसेच, बेन फोक्स याने ३२ धावांचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुलगा झोरावरच्या आठवणीने व्याकूळ झालेला ‘गब्बर’, भेटल्यानंतर कडकडून मारली मिठी, चाहतेही झाले व्यक्त