चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) दुसरा कसोटी सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व दिसून येत आहे. भारताने दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत २४९ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी रोहित शर्माविरुद्ध मैदानावरील पंचांनी मोठी चूक केली. ज्यावर इंग्लंडचा कर्णधार वैतागला. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
नक्की काय झाले?
झाले असे की इंग्लंडला पहिल्या डावात १३४ धावांवर बाद केल्यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला उतरले. पण गिल १४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर १३ व्या षटकात मोईन अली गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडने रोहित पायचीत असल्याचे अपील केले. यावर मैदानावरील पंचांनी रोहितच्या बॅटला चेंडू लागला असल्याचे सांगत नाबाद दिले. पण रोहितच्या बॅटला चेंडू लागला नव्हता. त्यामुळे इंग्लंडने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली.
यावेळी रोहितनेही त्याच्या बॅटला चेंडू लागला नसल्याचे सांगितले. नंतर या रिव्ह्यूमध्ये दिसत होते की चेंडू रोहितच्या पॅडला जेव्हा लागला तेव्हा त्याची बॅट पॅडच्या मागे होती. मात्र, मैदानावरील पंचांनी चेंडू बॅटला लागला असल्याचा अंदाज दिल्याने केवळ चेंडूचा परिणाम (इम्पॅक्ट) तपासण्यात आला. ज्यात चेंडू बाहेर असल्याचे दिसत होते. त्यामुळे रोहित नाबाद असल्याचे सिद्ध झाले. पण या रिव्ह्यूनंतर रुट मैदानावरील पंचांवर वैतागलेला दिसला. कारण त्याच्या मतानुसार चेंडू स्टंपला लागला असता.
https://twitter.com/sandybatsman/status/1360906862414102530
Not out Rohit Sharma pic.twitter.com/ngX2KRFWRe
— வைகை புயல் வடிவேலு (@James22899317) February 14, 2021
भारताचे सामन्यात वर्चस्व –
या सामन्यात भारताचा पहिला डाव ३२९ धावांवर संपला. भारताकडून रोहित शर्माने १६१ धावांची दीडशतकी खेळी केली. तर अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंतने अर्धशतके केली. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावांवरच उरकला. त्यांच्याकडून बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या. भारताकडून आर अश्विनने ५ विकेट्स घेतल्या.
यानंतर दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात १८ षटकात १ बाद ५४ धावा केल्या आहेत. भारताकडून रोहित शर्मा २५ धावांवर नाबाद आहे. तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बेन स्टोक्सचा त्रिफळा उडवत आर अश्विनचा ‘विश्वविक्रम’, मोठमोठ्या दिग्गजांवर ठरला वरचढ
INDvsENG 2nd Test : भारतीय गोलंदाजांनी गाजवला दुसरा दिवस; दिवसाखेर भारताकडे २४९ धावांची आघाडी