कोणत्याही क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची आणि मुख्य असते. सामन्यादरम्यान योग्य निर्णय घेतला जावा हे आव्हानात्मक काम पंचांना करावे लागते. पंचांकडे नेहमीच झेल आणि पायचीतसाठी अपील केली जाते. काही अपील अशा असतात, ज्यांचा निर्णय देताना पंचांनाही घाम फुटल्याशिवाय राहत नाही, विशेषत: जेव्हा गोलंदाज पूर्ण विश्वासाने विकेट मिळाल्याची अपील करतात. तसेच, क्रिकेट सामन्यादरम्यान काही मजेशीर घटनाही पाहायला मिळतात, ज्यामुळे पाहणाराही पोट धरून हसायला लागतो. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल
इंग्लंडमध्ये एका क्लब क्रिकेट (England Club Cricket) सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. यामध्ये पंचांनी आपली भूमिका काही काळासाठी बाजूला ठेवली आणि स्टंपसमोर उभ्या असलेल्या एका फलंदाजाच्या पॅडवर चेंडू लागताच गोलंदाजासोबत संघाच्या अपीलमध्ये सामील झाले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना ओडिहम आणि ग्रेवेल क्रिकेट क्लब विरुद्ध ओव्हर्टन क्रिकेट क्लब (Odiham & Greywell Cricket Club vs Overton Cricket Club) सामन्यादरम्यान घडली.
क्लबनेही व्हिडिओ केला शेअर
ओडिहम आणि ग्रेवेल क्रिकेट क्लबने (Odiham & Greywell Cricket Club) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ओडिहम आणि ग्रेवेल क्रिकेट क्लबने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जेव्हा पंच हा तुमचा खेळाडू असतो आणि यामध्ये सामील होणे त्याला आवडते.”
When your umpire is a player and just loves to be involved…. By appealing himself! 🤦🏼 @crickshouts @Frogboxlive @wecricket_ pic.twitter.com/3LAdMDFCg1
— OdihamCricketClub (@OdihamCricket) June 5, 2022
पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ओव्हर्टन संघाची धावसंख्या १२ धावांवर ५ विकेट्स इतकी होती. गोलंदाज सोफी कूक (Sophie Cook) हिने एक चेंडू बाहेर टाकला. हा चेंडू मायकल ईल्स (Michael Eeles) याने सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या पॅडला लागला आणि गोलंदाजासह क्षेत्ररक्षकांनी अपील केली. यादरम्यान पंचही बाद होण्याची अपील करताना दिसले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं भावा! लग्नाच्या ७ दिवसानंतर चेन्नईचा १४ कोटींचा हुकमी एक्का मैदानात परतला