इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या हंगामात सामन्यातील रोमांचापेक्षा जास्त पंचांच्या निर्णयांची चर्चा होते आहे. प्रत्येक सामन्यात एक तरी असा निर्णय असतो, ज्यावर खेळाडूंसह दर्शकही डोके धरायला भाग पडतात. सोमवारी (०२ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेलेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील हंगामातील ४७व्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले, जेव्हा श्रेयस अय्यरच्या विकेटवरून पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे हास्यास्पद वातावरण बनले.
राजस्थानच्या (RR vs KKR) १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या डावातील १३व्या षटकादरम्यान हा प्रसंग घडला. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट हे षटक टाकत होता. तर श्रेयस (Shreyas Iyer) यावेळी मैदानावर फलंदाजी करत होता. बोल्टच्या या षटकातील पाचवा चेंडू लेग स्टंपवर होता, ज्यावर श्रेयसने फिरवली. परंतु चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श न करता गेला आणि इकडे पंचांनी तो चेंडू वाईड असल्याचे सांगितले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पंचांनी हा चेंडू वाईड करार केल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) त्वरित डीआरएससाठी अपील केली. संजूला वाईडसाठी अपील करताना पाहून सर्वजण चकित होते. परंतु चेंडू श्रेयसच्या ग्लोव्ह्जला लागून गेला होता, ज्याला संजूने झेलले होते आणि मग विकेटसाठी अपील केली होती. परंतु पंचांनी (Umpire’s Wide Ball Decision) तो वाईड बॉल दिल्याने संजूने डीआरएस घेतला होता. पुढे तिसऱ्या पंचांनीही याची पुष्टी केली होती.
तिसऱ्या पंचांकडून आलेल्या निर्णयानंतर सर्वजण मैदानी पंचांकडे पाहू लागले की, अखेर त्यांनी हा चेंडू वाईड का दिला होता. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
https://twitter.com/MohitKu38157375/status/1521200349914476544?s=20&t=DqdZaOkrO5plHp84E_ia7Q
दरम्यान राजस्थानचे गोलंदाज या सामन्यात विशेष चमक दाखवू शकले नाही. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी मिळून सुरुवातीला संघाला मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोलकाता संघ १३ षटकांमध्ये ९२ धावांवर ३ विकेट्स अशा स्थितीत होता. परंतु पुढे रिंकू सिंग आणि नितीश राणाची जोडी मात्र राजस्थानच्या गोलंदाजांना फोडता आली नाही. या दोघांनीही शेवटच्या षटकात खोऱ्याने धावा ओढल्या.
नितीश राणाने ३७ चेंडू खेळताना नाबाद ४८ धावा केल्या, तर रिंकू सिंगने २३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. परिणामी ५ चेंडू शिल्लक असताना कोलकाताने हा सामना जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तीन सामन्यातच धुमाकूळ घातला’, केकेआरचा कर्णधार श्रेयसने ‘या’ खेळाडूला म्हटले फ्यूचर स्टार
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी प्रशिक्षकाने निवडले ‘बेस्ट ५ टी२०’ खेळाडू, ‘या’ एका भारतीयाचा समावेश
किती गोड! इंग्लंडमध्ये पुजाराला चीयर करतेय ‘खास चाहती’, क्यूट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस