आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यापूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून अंतिम सामना गाठला. आता या दोन्ही संघांतील लढत अंतिम सामन्यात पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) आयसीसीने या महामुकाबल्यासाठी सामना अधिकाऱ्यांची निवड केली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये एका भारतीयाचेही नाव सामील आहे.
आयसीसीने सांगितल्याप्रमाणे दक्षिण अफ्रिकेचे मराइस इरास्मस आणि इंग्लंडचे के रिचर्ड केटलबोर्ग यांना अंतिम सामन्यासाठी मैदानावरील पंचांच्या रूपात निवडले गेले आहे. भारतीय नितीन मेनन यांना टीव्ही/ तिसऱ्या पंचाच्या रूपात निवडले गेले आहे.
आयसीसीने यासंदर्भात माहिती देताना सांगितले आहे की, “पंच मराइस इरास्मस आणि रिचर्ड केटलबोर्ग रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याच्यात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ च्या अंतिम सामन्यावेळी मैदान्यात पंचाची जबाबदारी सांभाळतील.”
आयसीसी एलीट पॅनलमध्ये एकमात्र भारतीय पंच नितीन मेनन अंतिम सामन्यासाठी तिसऱ्या पंचाची भूमिका पार पाडतील. तसेच श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज कुमार धर्मसेना चौथा पंच असेल. मैनन यांच्यासाठी ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ते पुरुष टी-२० विश्वचषकात पंचगिरी करतील. मेनन यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्याव्यतिरिक्त संजन मदुगले सामना रेफरी आहेत.
तत्पूर्वी, अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी ज्या दोन संघांना प्रबळ दावेदार मानले जात होतो, ते दोन्ही संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पाच विकेट्सने पराभूत केले आणि अंतिम सामन्यात धडक घेणारा पहिला संघ बनला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला आश्चर्यकारकरीत्या पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियानेही या सामन्यात पाच विकेट्स राखून मिजय मिळवला होता. आता रविवारचा सामना रोमांचक ठरणार आहे आणि चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट सोडणार वनडे संघाचेही नेतृत्त्व? वाचा रवी शास्त्री काय म्हणतायेत
Video: वॉर्नरची पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमधील ‘ही’ चूक ऑस्ट्रेलियाला पडली असती भलतीच महागात
मॅथ्यू वेड म्हणतोय, ‘हसन अलीने जरी झेल घेतला असता, तरी आम्ही जिंकलोच असतो’