---Advertisement---

हे दिग्गज म्हणतात, दिवस-रात्र कसोटीसाठी अंपायरनेही करावी प्रॅक्टिस

On: गुरूवार, नोव्हेंबर 21, 2019 6:46 PM
---Advertisement---

22 नोव्हेंबरला कोलकाता येथे भारत विरुद्ध बांगलादेश  संघात दुसरा कसोटी सामना पार पडणार आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे.

त्यामुळे दिवस-रात्र कसोटीसाठी खेळाडूंबरोबरच पंचांनाही सराव केला पाहिजे, असे निवृत्त ऑस्ट्रेलियन पंच सायमन टाॅफेल (Simon Taufel) यांनी मंगळवारी सांगितले.

अंधारात गुलाबी चेंडू (Pink Ball) पाहणे केवळ फलंदाजच नव्हे तर पंचांसाठीदेखील एक आव्हान असेल. नवीन रंगाची सवय होण्यासाठी पंच काही सराव सत्रात हजर राहतील, अशी अपेक्षा टाॅफेल यांनी व्यक्त केली.

ऍडेलेड येथे पहिल्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यादरम्यान टाॅफेल हे अंपायर परफॉर्मन्स आणि ट्रेनिंग मॅनेजर होते.

चेंडू व्यवस्थितपणे दिसण्यासाठी पंच कृत्रिम लेन्सचा वापर करु शकतात, असे टाॅफेल यांनी सांगितले.

“चेंडू वेगळ्या दृष्टीने पाहण्यासाठी पंच काही खास लेन्स वापरतील की नाही हे मला माहित नाही. हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे. परंतु, पंच जास्तीत जास्त सराव सत्रांमध्ये भाग घेतील,” असे टाॅफेल म्हणाले.

“दिवस-रात्र कसोटी सामन्यात संध्याकाळच्या वेळी नैसर्गिक सुर्यप्रकाशाची जागा कृत्रिम प्रकाश घेईल. ही वेळ फलंदाजांना चेंडू पाहण्याची सर्वात कठीण वेळ असेल”, असे टाॅफेल म्हणाले.

“मला वाटते पंचांसाठीही असेच आव्हान असेल. हा सामना पंचांसाठी तितकाच कठीण आणि आव्हानात्मक असेल,” असेही टाॅफेल यावेळी म्हणाले.

बांगलादेशच्या खेळाडूंना गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे ते गुलाबी चेंडूविरुद्ध सावधपणे खेळतील, असे टाॅफेल यांचे मत आहे.

भारतातील अनेक क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडूने खेळले आहेत. परंतु, बांगलादेशने 2013 मध्ये एकमेव चार दिवसांचा दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता.

परंतु, कोलकातामध्ये होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताविरुद्ध खेळणाऱ्या बांगलादेशच्या संघातील कोणत्याही सदस्याने 2013 मधील दिवस-रात्र कसोटी सामन्यात भाग घेतला नव्हता.

ऑस्ट्रेलियन पंच सायमन टाॅफेल त्यांच्या ‘फाईंडिंग दि गॅप्स’ या पुस्तकाच्या प्रचारासाठी भारतात आले आहेत. ते 22 नोव्हेंबरला होणाऱ्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1197148364090949632

https://twitter.com/Maha_Sports/status/1197148333363490816

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---