---Advertisement---

‘आयपीएल सुरू होण्यापूर्वीच स्टेनने मला सांगितले होते…,’ उमरानने केला धक्कादायक खुलासा

On: बुधवार, जून 8, 2022 8:56 PM
Dale-Steyn-Umran-Malik
---Advertisement---

आयपीएलच्या १५व्या हंगामात भारतीय संघाला एक जबरदस्त वेगवान गोलंदाज मिळाला आहे. हा गोलंदाज दुसरा कोणी नसून उमरान मलिक आहे. उमरानने आयपीएलमध्ये प्रत्येकाला मोहित केले आहे. त्याच्या आयपीएलच्या प्रदर्शनावरून त्याला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या टी२० मालिकेसाठी संघात सामील केले आहे.  मात्र, आता उमरानने याबाबत एक मोठे विधान केले आहे.

आयपीएल २०२२मध्ये उमरान सनरायजर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करत होता. यावेळी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकीचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेन जबाबदारी पार पाडत होता. आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आपण भारतीय संघात निवडले जाऊ अशी भविष्यव्णी डेल स्टेन याने केली असल्याची माहिती उमरानने दिली आहे. उमरानच्या या विधानानंतर आता क्रिकेट जगतात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उमरान याबाबत बोलताना म्हणाला की, “माझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा मी डेल स्टेनसोबत टीम बसमध्ये होतो. सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी बसमध्ये माझे अभिनंदन केले. यादरम्यान माझे गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेन म्हणाले की, मी तुला आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वीच सांगितले होते की, हंगाम संपल्यानंतर तुझा भारतीय संघात निश्चितपणे समावेश केला जाईल.”

सध्या भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबद्दल बोलताना उमरान म्हणाला की, “राहुल द्रविड यांना भेटून खूप छान वाटले. ते क्रिकेटचा एक विद्वान खेळाडू आहे. त्यांनी मला सांगितले की तू जे करत आहेस ते चालू ठेव. ९ जूनपासून उमरान मलिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. त्यावद्दल मी त्यांचा आभारी आहे. या मालिकेत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.”

दरम्यान, उमरान आयपीएल २०२२मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळला. त्याने १४ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या असून तो हैद्राबादकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. ताशी १५७ पेक्षा अधिक वेगवान गतीने गोलंदाजी करत त्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे भारीये! फलंदाजाच्या पॅडवर चेंडू लागताच बॉलरसह पंचांनीही केली अपील, पाहा मजेशीर Video

उमरानने खरंच मोडलाय का अख्तरचा विक्रम? वाचा काय आहे भानगड

मानलं भावा! लग्नाच्या ७ दिवसानंतर चेन्नईचा १४ कोटींचा हुकमी एक्का मैदानात परतला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---