रविवारी (दि. १७ एप्रिल) आयपीएल २०२२मध्ये डबल हेडर सामन्यांतील पहिला सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाब संघ उतरला होता. यावेळी त्यांनी निर्धारित २० षटकात सर्वबाद १५१ धावा केल्या. यावेळी पंजाबला हैदराबादच्या एका गोलंदाजाने चिंतेत टाकले. तो गोलंदाज म्हणजे उमरान मलिक. मलिकने यावेळी एक खास कारनामा केलाय. तो अशी कामगिरी करणारा आयपीएलमधील चौथाच खेळाडू ठरला.
पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना १९व्या षटकापर्यंत १५१ धावा कुटल्या होत्या. त्यांनी शेवटच्या षटकात एकही धाव घेता आली नाही. विशेष म्हणजे, त्यांनी या षटकात आपले ४ फलंदाज गमावले. हैदराबादकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी उमरान मलिक आला होता. यावेळी त्याने षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ओडियन स्मिथला तंबूत धाडले. त्यानंतर मलिकने तिसरा चेंडू निर्धाव टाकला. चौथ्या चेंडूवर त्याने राहुल चाहरला त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने वैभव अरोरालाही त्रिफळाचीत केले. यानंतर त्याच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला.
Stumps were flying, catches being taken and there was a lot of pace courtesy Umran Malik!
Not a run scored in the final over of the innings and Malik ends up with figures of 4/28 🔥🔥#PBKSvSRH #TATAIPL
Follow the game here https://t.co/NsKw5lnFjR pic.twitter.com/w7CJoSwIVY
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2022
अशाप्रकारे त्याने शेवटच्या षटकात एकही धाव न देता ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये शेवटचे षटक निर्धाव षटक टाकणारा चौथा खेळाडू ठरला. अशी कामगिरी सर्वात आधी इरफान पठाणने केली होती. त्याने २००८ साली पंजाब संघाकडून खेळताना मुंबईविरुद्ध शेवटचे षटक निर्धाव टाकले होते. त्यानंतर २००९ साली मुंबईच्या लसिथ मलिंगाने डेक्कनविरुद्ध शेवटच्या षटकात एकही धाव दिली नव्हती. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जयदेव उनाडकट आहे. त्याने २०१७ साली रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात एकही धाव न देण्याचा कारनामा केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
आयपीएलमध्ये शेवटचे षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज
इरफान पठाण (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २००८)
लसिथ मलिंगा (विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २००९)
जयदेव उनाडकट (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१७)
उमरान मलिक (विरुद्ध पंजाब किंग्स, २०२२)*
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे कमीत कमी आयपीएल कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे’, मुंबईच्या सलग ६ पराभवानंतर रोहितवर भडकले चाहते
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’