पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात सपशेल फ्लॉप ठरताना दिसत आहे. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यात सपाटून पराभव पत्करला आहे. असे पहिल्यांदाच झाले आहे, जेव्हा मुंबई तब्बल सलग ६ सामन्यात पराभूत झाला आहे. शनिवारी (दि. १६ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध झालेल्या २६व्या सामन्यात मुंबईला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चाहते चांगलेच भडकले असून ते रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी करतायेत.
यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला २०१९ साली सलग ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माने (Rohit Sharma) विराटच्या या नकोशा विक्रमाची बरोबरी केलीये. लखनऊ सुपर जायंट्सने दिलेल्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघ ९ विकेट्स गमावत फक्त १८१ धावाच करू शकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या सामन्यात रोहित शर्माला खास कामगिरी करता आली नाही. त्याने ७ चेंडूंचा सामना करताना फक्त ६ धावा केल्या. रोहितने या हंगामात खेळताना ६ सामन्यात १९च्या सरासरीने ११४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ४१ राहिलीये. रोहितच्या या खराब फलंदाजीमुळे चाहत्यांना राग अनावर झालाये. एका चाहत्याने रोहितची खराब फलंदाजी पाहून त्याला टॅग केले आणि ट्वीट करत लिहिले की, “कृपया मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन फलंदाजीवर लक्ष दे.”
https://twitter.com/balachandarjain/status/1515331760498016266
याव्यतिरिक्त दुसऱ्या युजरने लिहिले की, “या खराब कामगिरीनंतर रोहित शर्माची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हाकालपट्टी केली पाहिजे.”
https://twitter.com/Ssrfan__/status/1515326837580496896
आणखी एका युजरने लिहिले की, “रोहित कमीत कमी आयपीएलच्या कर्णधारपदाचा तरी राजीनामा दे. फलंदाजीत आऊट ऑफ फॉर्म आणि खराब नेतृत्व.” अशाप्रकारे सोशल मीडियावर अनेक लोक त्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा देण्याबद्दल बोलत आहेत.
https://twitter.com/I_am___Abhishek/status/1515330114212433921
रोहित शर्माची आयपीएल कारकीर्द
रोहित शर्माच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २१९ सामन्यातील २१४ डावात फलंदाजी करताना ३०.७८च्या सरासरीने ५७२५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ४० अर्धशतके झळकावली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’
IPL2022| गुजरात वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!