नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या १५व्या हंगामात विशेष चमक दाखवलेल्या, आणि त्यानंतर थेट भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या उमरान मलिकने नव्या विक्रमाची नोंद केली असल्याचा दावा केला जात आहे. उमरानने सरावा दरम्यान,सर्वात वेगवान गतीने गोलंदाजी केली असल्याचा या दाव्यात समावेश आहे. याबाबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्याने १५०पेक्षा वेगवान गतीने गोलंदाजी करणाऱ्या उमरानने (Umran Malik) ताशी १५७च्या वेगाने चेंडू फेकत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर उमरान शोएब अख्तरच्या (Shoaib Akhtar) आंंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडेल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मात्र, या व्हायरल पोस्टमधून त्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे.
https://twitter.com/prajk_23/status/1534219510298734592?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1534219510298734592%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Find-vs-sa-is-umran-malik-ball-163-7-kph-in-practice-session-ahead-of-1st-t20-shoaib-akhtar-fastest-ball-in-ipl-history-true-or-false%2Farticleshow%2F92076259.cms
या व्हायरल फोटोमध्ये उमरान नेट्स मध्ये सराव करताना दिसत आहे. त्यावेळी स्पिडोमीटरमध्ये उमरानच्या चंडूचा वेग मोजला जात होता. त्या स्पिडोमीटरवर उमरानने ताशी १६३.७ किमी वेगाने चेंडू टाकला असल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात बीसीसीआय वा अन्य कोणाकडूनही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सरावात उमरानने इतक्या वेगाने चेंडू टाकला असला तरी त्याच्या नावे विक्रमाची नोद होवू शकत नाही.
दरम्यान, पाकिस्तानी दिग्गज शोएब अख्तरने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू (ताशी गती १६१ किमी) टाकला होता. अख्तरचा हा विक्रम मोडणारा एकही गोलंदाज अद्याप मिळालेला नाहीये. अशात चाहते उमरानकडून खूप अपेक्षा लावून बसले आहेत. उमरान मलिक मुळचा जम्मू कश्मीरचा आहे. मागच्या वर्षी सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल पदार्पणाची संधी दिली. त्याचे प्रदर्शन पाहून हैदराबादने त्याला यावर्षी मेगा लिलावापूर्वी रिटेन केले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्याच्या प्रदर्शनात खूप सुधारणा पाहायला मिळाली आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मानलं भावा! लग्नाच्या ७ दिवसानंतर चेन्नईचा १४ कोटींचा हुकमी एक्का मैदानात परतला
सामना हरला म्हणून काय झालं, फलंदाजाच्या त्या ‘नो लूक सिक्स’चीच सर्वत्र रंगलीय चर्चा
पुणेरी वॉरियर्स, एएफए सॅमफोर्ड, भारती एफसी उपांत्यपूर्व फेरीत