सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी (०५ मे) आयपीएल २०२२चा ५०वा सामना खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर भल्यामोठ्या २०७ धावा केल्या. मात्र या सामन्यादरम्यान हैदराबादकडून उमरान मलिक याने भेदक गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले.
उमरानने (Umran Malik) या सामन्यात अतिशय वेगवान गोलंदाजी करत स्वत:चाच हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम मोडित काढला (Umran Malik Broke His Own Record) आहे.
या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना डावातील १२व्या षटकात त्याने या अद्वितीय कामगिरीला गवसणी घातली आहे. १२व्या षटकातील दुसरा चेंडू त्याने चक्क १५४.८ किमी दर ताशी वेगाने फेकला. त्यानंतर २०व्या षटकातील चौथा चेंडू त्याने १५७ किमी दर ताशी वेगाने फेकला. हा आयपीएल २०२२ हंगामातील सर्वात वेगवान चेंडू आहे. यासह त्याने स्वत:चाच आयपीएलमधील सर्वात गतीमान चेंडू फेकण्याचा विक्रम मोडला आहे. त्याने यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १५४ किमी दर ताशी वेगाने चेंडू फेकला होता, जो त्याचा सर्वात वेगवान चेंडू होता.
Umran malik bowled a dilevery with a speed of 154.8km/hr 😳😳😳
Fastest dilevery of the season,unreal pace.— 𝐀𝐧𝐮𝐛𝐡𝐚𝐯 (@Anubhav263) May 5, 2022
याखेरीज उमरान आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. तर आयपीएल इतिहासातील एकूण दुसरा सर्वात वेगवान चेंडू त्याने टाकला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू-
शॉन टेट- १५७.७१ किमी दर ताशी
उमरान मलिक- १५७ किमी दर ताशी
एन्रिच नॉर्किया- १५६.२२ किमी दर ताशी
Umran Malik breaks own record, bowled fastest delivery of this season – 154.8 Kmph. Incredible. pic.twitter.com/JThGTpNQY1
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 5, 2022
उमरानच्या या भेदक गोलंदाजीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेकांनी गोलंदाजीला आश्चर्यकारक म्हटले आहे. परंतु उमरान या सामन्यात हैदराबादचा सर्वाद महागडा गोलंदाज ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक ५२ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याच्या गोलंदाजीवर रोवमन पॉवेल आणि डेविड वॉर्नर या दिल्लीकर फलंदाजांनी खणखणीत षटकारही ठोकले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उमरान मलिकचं यश पाहून पाकिस्तानी क्रिकेटर म्हणाला, ‘कोणीही उठतं, शूज घेऊन फास्ट बॉलर बनायला जातं’
वॉर्नरने घेतला ‘अपमानाचा बदला’! सनरायझर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत पूर्ण केले ४०० सिक्स
आयपीएल २०२२ची ‘फ्लॉप इलेव्हन’, रोहितकडे उपकर्णधारपद; पाहा कोण बनलंय कर्णधार