आजवर आपण अनेक क्रिकेटचे सामने पाहिले. अनेक सामन्यांत गोलंदाजाच्या एका षटकामुळे किंवा एखाद्या फलंदाजाच्या तुफानी खेळीमुळे सामना जिंकल्याचे किस्से अनेकदा पाहिले. मात्र, इंग्लंडमधील टी२० ब्लास्ट स्पर्धेत झालेल्या सामन्यांत मात्र, काहीतरी अजब घडल्याचे पहायला मिळाले. या सामन्यात एकदम चांगल्या फॉर्म मध्ये खेळत असलेल्याा संघाची एकदम घसरण झाल्याचे दिसून आले.
हा सामना इंग्लंडमधील टी२० लीग मध्ये ग्लॉस्टरशायर आणि ससेक्स यांच्यात खेळला गेला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात गोलंदाजच सामन्याचा हिरो ठरला. प्रथम फलंदाजी करताना ग्लॉस्टरशायरने २० षटकांत ६ गडी गमावून १४५ धावा केल्या. टी२० मध्ये बहुतांश प्रसंगी कोणत्याही संघाने हे लक्ष्य गाठले असते. ससेक्सही ज्या पद्धतीने खेळत होता, ते पाहता ती हे लक्ष्य सहज साध्य करेल, असे वाटत होते. पण, तसे झाले नाही.
ससेक्सच्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली नाही. टीम सेफर्ट पाचव्या चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कर्णधार रवी बोपाराही (१०) बाद झाला. ४९ धावांवर ससेक्सची दुसरी विकेट पडली. यानंतर टॉम अलॉस्प आणि फिन हडसन यांनी चांगली फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. पण, ११८ धावांच्या स्कोअरवर ससेक्सला हडसनच्या रूपाने तिसरा धक्का बसला.
Turnaround = Complete ????
What. A. Match.#Blast22 pic.twitter.com/P8vLB7vlqT
— Vitality Blast (@VitalityBlast) June 10, 2022
यानंतर ससेक्सला विजयासाठी आणखी २८ धावांची गरज होती आणि त्यांचे ७ फलंदाज उरले होते. पण, इथून कथा पूर्णपणे बदलली आणि ग्लॉस्टरशायरच्या गोलंदाजांनी सामन्याचे फासे वळवले आणि अवघ्या २३ धावांत ससेक्सचे उर्वरित फलंदाज बाद झाले आणि संपूर्ण संघ केवळ १४१ धावा करू शकला आणि सामना ४ धावांनी गमावला. एकेकाळी जी मॅच जीव मुठीत धरत होती, ती हातातून निसटली.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा-
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती
क्रिकेटमधील ‘त्या’ सर्वात ऐतिहासिक सामन्याला आज ११५ वर्षे पूर्ण
‘या ६ महिन्यांत मला झालेला त्रास कोणालाही माहिती नाही,’ हार्दिक पंड्याने व्यक्त केली हळहळ






