---Advertisement---

‘कॅच ऑफ द टुर्नामेंट?’ न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने टिपला अविश्वसनीय झेल; पाहा व्हिडिओ

On: बुधवार, ऑक्टोबर 27, 2021 8:10 AM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सुपर १२ सामन्यांचा थरार सुरू आहे. मंगळवारी (२६ ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुध्द पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत करणाऱ्या पाकिस्तान संघाने या सामन्यात न्यूझीलंड संघाला ५ गडी राखून पराभूत केले. यासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंड संघातील खेळाडू डेवोन कॉनवेने एक अविश्वसनीय झेल टिपला.ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

या सामन्यात पाकिस्तान संघाला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, मोहम्मद रिजवानने या सामन्यात देखील ३३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर शेवटी या संघातील दिग्गज फलंदाज शोएब मलिकने नाबाद २६ आणि आसिफ अलीने २७ धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला.

डेवोन कॉनवेने टिपला अविश्वसनीय झेल 

तर झाले असे की, पाकिस्तान संघातील दिग्गज फलंदाज मोहम्मद हफीज ११ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी ११ वे षटक टाकण्याची जबाबदारी कर्णधार केन विलियम्सनने मिचेल सॅंटनरला दिली होती. या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद हफीजने स्टेप आऊट होऊन लाँग ऑफच्यावरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या डेवोन कॉनवेने धावत जाऊन डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य झाले होते. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ICC/status/1453084584787206145?t=LGixsOB4AwdgiLkTzUFlbg&s=19

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डॅरिल मिशेलने २७ आणि डेवोन कॉनवेने देखील २७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ८ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ३३ आणि आसिफ अलीने नाबाद २७ आणि शोएब मलिकने नाबाद २६ धावांची खेळी करत पाकिस्तान संघाला हा सामना ५ गडी राखून जिंकून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---