इंडियन प्रीमियर लीगShubham Dubeyमध्ये नेहमीच नव्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळत आली आहे. आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी मंगळवारी (19 डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळणारा शुभम दुबे याच्यासाठी आयपीएल फ्रँचायझींनी मोठी बोली. अखेर राजस्थान रॉयल्सने सर्वात मोठी बोली लावून दुबेला संघात घेतले.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही आयपीएलमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. आयपीएल किंवा भारतीय संघासाठी याआधी कधीच न खेळलेल्या शुभम दुबे (Shubum Dubey) याला पहिल्याच आयपीएल हंगामात मोठी रक्कम मिळाली. राजस्थान रॉयल्सने त्याला खरेदी करण्यासाठी एक-दोन नाही तर तब्बल 5.8 कोटी रुपये खर्च केले. अवघ्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजसह दुबे लिलावासाठी मैदानात उतरला होता. पण त्याला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झुंबड लागली. अखेर ही स्पर्धा राजस्थानने 5.8 कोटी रुपये खर्च करून जिंकली. अनकॅप्ड शुबम दुबेसाठी नक्कीच ही रक्कम मोठी आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शुबम दुबेने विदर्भ संघासाठी 8 लिस्ट ए, आणि 20 टी-20 सामने खेळले आहेत. लिस्ट एमध्ये त्याच्या नावावर 159, तर टी-20 सामन्यांमध्ये 485 धावा केल्या आहेत. असे असले तरी, यावर्षी सय्यम मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शुबमने 7 सामन्यांमध्ये 73.66च्या सरासरीने आणि 187.28च्या स्ट्राईक रेटने 221 धावा केल्या. याच प्रदर्शनाचा मोबदला त्याला आयपीएल लिलिवातून मिळाल्याचे दिसते.
29 वर्षी मध्यक्रमातील फलंदाज आयपीएलमध्ये राजस्थान संघासाठी काय कमला करणार, हे पाहण्यासारखे असेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल इतिहिसाताली सर्वात महागडा खेळाडू ठरला. स्टार्कला खरेदी करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपये खर्च केले. (Uncapped Shubum Dubey bought by Rajasthan Royals for Rs 5.8 crore)
महत्वाच्या बातम्या –
INDvsSA 2nd ODI: टॉस जिंकत यजमानांनी घेतली बॉलिंग, भारताकडून रिंकूचं वनडे पदार्पण; श्रेयस बाहेर
90 मिनिटात घडला आयपीएल इतिहास! स्टार्कसाठी केकेआरची सर्वात मोठी बोली, कमिन्सलाही टाकलं मागे