प्रथमच १७ वर्षाखालील विश्वचषकाच्या आयोजनाची संधी मिळालेल्या भारताने काल आपला पहिला सामना अमेरीके बरोबर दिल्लीच्या मैदानात खेळला. सुरुवातीपासून प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा दबाव दिसत होता. त्याचा परिणाम ०-३ अश्या पराभावाने झाला.
पहिल्या हाफच्या २९ व्या मिनिटाला जितेंद्रच्या पेनल्टी बाॅक्स मधल्या चुकीमुळे फाऊल झाला आणि अमेरीकाच्या संघाला पेनल्टी मिळाली. जोसुआने संधीचा फायदा घेत उजव्या पायाने डाव्या कोपऱ्यात बाॅल टाकून गोल करत उत्कृष्ट पेनल्टीचा नमुना दाखवला. पहिल्या हाफचा शेवट ०-१ असा झाला.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीच्या काही मिनिटातच क्रिस्तोफरने काॅर्नर वरुन आलेल्या बाॅलला बाॅक्स च्या मधुन डाव्या पायाने उजव्या कोपर्यात मारुन ०-२ अशी आघाडी मिळवून दिली.
८४ व्या मिनिटाला अन्वर अलीने कोमलच्या पासने गोल करायचा प्रयत्न केला पण बाॅल गोल पोस्टच्या बारला लागून परत आला आणि त्याच बाॅलने पलटवार करत अकोस्टाच्या असिस्टने कार्लेटोनने भारतावर तिसरा गोल केला.
भारत या सामन्यानंतर गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. पुढील सामने ९ ऑक्टोबरला कोलंबिया तर १२ ऑक्टोबरला घाना बरोबर दिल्ली येथेच आहेत. अंतिम १६ साठी दोन्ही सामने जिंकणे भारताला अत्यंत गरजेचे आहे.
आज ब्राझील विरुद्ध स्पेन सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. हा सामना ५ वाजता कोचीच्या जवाहरलाल नेहरु मैदानावर खेळवला जाणार आहे.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)