आयसीसी पुरुष 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2026ला 15 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका असा होणार आहे. बुलवायो येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, मात्र चाहत्यांची नजर स्फोटक फलंदाज वैभव सुर्यवंशी याच्यावर असणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सामने खेळले जाणार असून दुसरा सामना झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड आणि तिसरा सामना टांझानिया विरुद्ध वेस्ट इंडिज असा होणार आहे.
या स्पर्धेत प्रत्येक दिवशी दोनपेक्षा अधिक सामने खेळले जाणार आहेत. भारतात या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जियो हॉटस्टारवर होणार आहे. भारताचे सर्व सामने जियो हॉटस्टारबरोबरच टीव्हीवर सुद्धा दाखवले जाणार आहेत. तसेच एका दिवशी तीन सामने असल्याने काहीच सामने टीव्हीवर दाखवले जाणार आहेत.
भारत या स्पर्धेत ग्रुप ए मध्ये आहे. या गटात अमेरिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघही आहेत. या स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच सर्वांच्या नजरा वैभववर आहेत. त्याने मागील काही महिन्यांपासून त्याच्या स्फोटक फलंदाजीने एक नवीन चाहता वर्ग तयार केला आहे.
आयुष आणि वैभव या दोघांकडेही आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. भारत या स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्याची वनडे मालिका खेळला. ज्यामध्ये भारत 3-0 असा जिंकला, मात्र या सामन्यांमध्ये आयुष दुखापतीमुळे खेळला नाही. तो आता पूर्णपणे फिट असून संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
भारत अंडर-19 संघ: आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, ऍरॉन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, आर एस अंबरिश, कनिष्क चौहान,अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), खिलन पटेल, हरवंश पंगालिया, दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंह, हेनिल पटेल, उद्धव मोहन, मोहम्मद इनान.
अमेरिका अंडर-19 संघ: उत्कर्ष श्रीवास्तव (कर्णधार), अमरिंदर गिल, साहिल गर्ग, अदनित झाम्ब, रिषभ शिंपी, नितीश सुदिनी, अर्जुन महेश (विकेटकीपर), अदनित झाम्ब, अमोघ अरेपल्ली (विकेटकीपर), शिव शनि, अदित कप्पा, साहिर भाटिया, रायान ताज, अद्वैत कृष्णा, सबरीश प्रसाद, रित्विक अप्पिडी.






