कॅरेबियन बेटांवर सध्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा (U19 World Cup) थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना गतविजेत्या बांगलादेशविरुद्ध होणार आहे. शनिवारी (२९ जानेवारी) होणाऱ्या या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
भारतीय संघाने साखळी फेरीत ब गटातील सर्व सामने जिंकले आहेत. तसेच बांगलादेशने गट अ मधील तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघात रोमांचक सामना होण्याची सर्वांना अपेक्षा आहे. कारण, २०२० साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात या दोन संघातच अंतिम सामना रंगला होता. त्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारतावर विजय मिळवत विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे तशीच कामगिरी शनिवारी करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल, तर भारतीय संघ मागील पराभवाचा बदला घेत बांगलादेशला स्पर्धेबाहेर करण्यास उत्सुक असेल.
दरम्यान, भारतासाठी आनंदाची बातमी म्हणजे साखळी सामन्यांदरम्यान कोविड पॉझिटिव्ह आढळलेला कर्णधार यश धूल याचा कोरोना अहवाल उपांत्यपूर्व फेरीपूर्वी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध असेल.
भारत-बांगलादेश (India vs Bangladesh) उपांत्यपूर्व सामन्याबद्दल सर्वकाही
१. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना केव्हा खेळला जाणार आहे?
– भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना शनिवारी (२९ जानेवारी) पार पडणार आहे.
२. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना कुठे खेळला जाईल?
– भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना कूलिज क्रिकेट ग्राउंड, अँटिग्वा येथे पार पडणार आहे.
३. किती वाजता सुरू होईल भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना?
– भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी ६.०० वाजता होईल.
४. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना लाईव्ह कुठे पाहू शकाल?
– भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता.
५. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील १९ वर्षांखालील उपांत्यपूर्व सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टार ऍपवर पाहू शकता. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट तुम्ही www.mahasports.in वर मिळवू शकतात.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारत – यश धुल (कर्णधार), दिनेश बाना (यष्टीरक्षक), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, आराध्य यादव, निशांत सिंधू, कौशल तांबे, रवी कुमार, सिद्धार्थ यादव, राजवर्धन हंगरगेकर, मानव पारेख, अनिश्वर गौतम, राज बावा, वासू , विकी ओस्तवाल, गरव सांगवान.
बांगलादेश – रकीबुल हसन (कर्णधार), अब्दुल्ला अल मामून, अरिफुल इस्लाम, मोहम्मद फहीम, महफिझुल इस्लाम, रिपन मंडोल, नैमूर रोहमन, तन्झीम हसन साकिब, प्रांतीक नवरोज नबिल, आईच मुल्ला, आशिकुर जमान, इफ्ताखार हुसैन इफ्ती, एसएम महरोब, मुस्फिक हसन, तहजी इस्लाम.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्लॅशबॅक! १६ वर्षांपूर्वी इरफान पठाणने पाकिस्तान विरुद्ध घेतली होती हॅट्रिक, पाहा व्हिडिओ
आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक
व्हिडिओ पाहा – २०१९ विश्वचषक सेमीफायनलनंतर काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये