---Advertisement---

द्रविडच्या नेतृत्त्वाखाली प्रशिक्षकांना बनवले जाणार विश्वस्तरीय, एनसीएमध्ये सुरू होणार ‘कार्पोरेट क्लास’

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 10:01 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटला मजबूत करणे आणि युवा खेळाडूंमध्ये सुधारणा केल्यानंतर आता राहुल द्रविड देशांतर्गत क्रिकेटच्या प्रशिक्षकांना जास्त प्रतिभाशाली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणार आहे. भारतीय क्रिकेटची संरक्षक भिंत मानला जाणारा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) देशातील क्रिकेट प्रशिक्षकांसाठी विशेष ट्रेनिंंगला सुरुवात केली आहे. ही ट्रेनिंग ‘काॅर्पोरेट क्लासे’स या नावाने सुरू केली गेली आहे.

प्रशिक्षक आणि निवडकर्ते यांच्यात सामंजस्य वाढवण्यासाठी दिले जाणार प्रशिक्षण
एनसीएच्या या कोर्समध्ये भाग घेणाऱ्या प्रशिक्षकांना दबावाच्या परिस्थितीत काय करायचे?, त्याला कसे सामोरे जायचे? हे शिकवले जाणार आहे. अनेकदा असे होते की, निवडकर्त्याचे मत हे प्रशिक्षकाच्या मतापेक्षा वेगळे असते. अशावेळी प्रशिक्षक त्याचे मत निवडकर्त्याला अशाप्रकारे पटवून देतो हे महत्वाचे ठरते. त्यामुळे या कोर्समध्ये निवडकर्त्यांशी कशाप्रकारे सामंजस्य ठेवायचे याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

लेवल २ चा प्रशिक्षक तयार करणार एक खेळाडू
काॅर्पोरेट कोर्सशिवाय एनसीएच्या प्रशिक्षकांसाठी दुसरेही कोर्स आहेत. यामध्ये लेवल २ कोर्सही आहे. यावेळी लेवल २ कोर्स केलेल्या प्रशिक्षकांना एक कार्य दिले गेले आहे. या प्रशिक्षकांनी त्यांच्या शहरात जाऊन त्याठिकाणी एका खेळाडू तयार करायचा आहे. हा त्या प्रशिक्षकाच्या प्रकल्पाचा एक भाग असणार आहे.

द्रविड स्वत: घेतो प्रशिक्षण
काॅर्पोरेट कोर्सचे वैशिष्ट्य आहे की, तेथे द्रविड ट्रेनर किंवा शिक्षकाच्या भूमिकेत नसून तो स्वत: प्रशिक्षकांसोबत प्रशिक्षण घेत असतो. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. द्रविड प्रशिक्षकांशी त्याचे विचार शेअर करतो आणि स्वत:ही त्यांचे विचार ऐकून घेतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘गुरुजीं’नी जे ठरवलं ते केलंच! रोहित शर्माला कसोटी फलंदाज बनवण्यात शास्त्रींचा मोठा वाटा

चेतन सकारियाला फ्रँचायझीने विचारला घरचा पत्ता, गोलंदाजाचे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल

मुंबई विरुद्ध ओमान संघातील पहिली टी२० लढत आजपासून, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---