---Advertisement---

सतत फ्लॉप ठरत असलेल्या श्रीलंकन क्रिकेटपटूंवर चाहत्यांचा संताप; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

---Advertisement---

गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकन संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहेत.अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवा खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरत आहेत. नुकतीच इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. या मालिकेत इंग्लंड संघाने श्रीलंकन संघाचा ३-० ने धुव्वा उडवल्यानंतर श्रीलंकन चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी आगळी वेगळी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.

शनिवारी (२६ जून ) झालेल्या तिसऱ्या टी -२० सामन्यात श्रीलंकन संघाला ८९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर ३-० ने मालिका देखील गमवावी लागली आहे. श्रीलंकन संघाला सलग ५ टी -२० मालिकेत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे श्रीलंकन चाहत्यांनी सोशल मीडियावर अनफॉलो क्रिकेटर्स हा हॅशटॅग सुरू केला.(Unfollow cricketers Sri Lanka fans abandon’s player after defeat against England)

न्यूजसेंटर डॉट आयके सांकेतिक स्थळाने म्हटले की,”रविवारी फेसबुकवर अनफॉलो क्रिकेटर्स हा हॅशटॅग ट्रेडिंग होता. हजारो क्रिकेट चाहत्यांनी कुसल मेंडिस आणि सलामी फलंदाज धनुष्का गुणाथिलका यांच्या फेसबुक पेजवर बहिष्कार टाकला. ही मोहीम राबवण्याचा मुख्य उद्देश, श्रीलंकन क्रिकेटपटूंना त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून अनफॉलो करणे असा आहे.”

तसेच क्रिकेट चाहते मीम्स शेअर करत आहे. ज्यामध्ये ते एकमेकांना आवाहन करत आहेत की, राष्ट्रीय संघाचा कुठलाही लाईव्ह सामना पाहू नका. अहमद इनामुलहकने ट्विटरवर म्हटले की, “या सर्व अपयशी ठरलेल्या क्रिकेटपटूंना अनफॉलो करून टाका. जर ते राष्ट्रीय संघासाठी चांगली कामगिरी करत नसतील तर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष केंद्रित करू नका.तर कौतुक करण्याच्या लायकीचे नाहीत.”

https://twitter.com/Ahmedinaamulhaq/status/1408873337716097027

याबाबत कुठल्याही वरिष्ठ खेळाडूंनी प्रतिक्रीया दिली नाही, परंतु अनेकांनी असे म्हटले की, ही श्रीलंकन संघाची गेल्या ३ ते ४ दशकातील सर्वात खराब कामगिरी आहे.

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात मंगळवार (२९ जून ) पासून ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. श्रीलंकेचा कर्णधार कुसल परेराने म्हटले की, “आम्हाला माहीत होते की, ही एक कठीण मालिका असणार आहे. परंतु, आमची फलंदाजी इतकी खास नव्हती. हा एक मुख्य मुद्दा होता.”

महत्वाच्या बातम्या-

भारीच! युवराज खेळू शकतो ऑस्ट्रेलियातील ‘या’ क्लबकडून; डिविलियर्स, लारासारख्या खेळाडूच्या सहभागाची शक्यता

“श्रीलंका दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी देणे शक्य नाही”, द्रविडचे मोठे भाष्य

ब्रेथवेटच्या ४ षटकारांची स्टोक्सने केली सव्याज परतफेड, व्हिडिओ होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---