पुणे, १५ जुलै, २०२३: आदरणीय केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ ला भेट दिली आणि त्यांनी पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या टेबल टेनिसच्या रोमांचक सामन्यांचा आनंद लुटला.
माननीय मंत्र्यांनी गोवा चॅलेंजर्स आणि दबंग दिल्ली टीटीसी यांच्यातील रोमहर्षक सामना पाहिला. दोन्ही संघ सलामीच्या लढतीत आत्मविश्वासाने खेळ करताना दिसले. अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ हा DafaNews द्वारे समर्थित आहे. यूटीटीच्या प्रवर्तक विटा दाणी, टीटीएफआयचे सरचिटणीस कमलेश मेहता, आयटीटीएफचे अध्यक्ष पेट्रा सोरलिंग हेही उपस्थित होते.
टेबल टेनिस सीझन ४ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमावर प्रसारित होत आहेत. चालू हंगामात अचंता शरत कमल, मनिका बात्रा, साथियान ज्ञानसेकरन आणि क्वाद्री अरुणा, लिली झँग आणि ओमर असार यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्ससह अव्वल भारतीय खेळाडूंचा सहभाग आहे. प्रतिष्ठित विजेतेपदासाठी यू मुंबा टीटी, चेन्नई लायन्स, बंगळुरू स्मॅशर्स, दबंग दिल्ली टीटीसी, पुणेरी पलटण टेबल टेनिस आणि गोवा चॅलेंजर्स या सहा फ्रँचायझींमध्ये चुरस रंगणार आहे. (Union Minister Kiren Rijiju enjoyed the exciting matches of Ultimate Table Tennis Season 4)
महत्वाच्या बातम्या –
गिलच्या कसोटी संघातील जागेवर दिग्गजाचा आक्षेप! म्हणाले, “कामगिरी नव्हेतर पसंतीमुळे त्याला स्थान”
आरसीबीने सुरू केली पुढील हंगामाची तयारी! ‘या’ दोघांना दिला नारळ, वाचा सविस्तर