पुणे| पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात आदित्य राजहंस(3-44 व 41धावा)याने दोन्ही डावात केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघावर 2 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुसऱ्या सामन्यात रोहित चौधरी(4-63) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाला 202 धावावर रोखत पहिल्या डावात 55 धावांची आघाडी मिळवली.
येवलेवाडी येथील ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावरील तीन दिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशी युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाच्या 34षटकात 5बाद 134धावापासून आज खेळ पुढे सुरू झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने 43 धावांची आघाडीसह दुसऱ्या डावात 53.1षटकात 176 धावा करून युनायटेड स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी 220 धावांचे आव्हान उभे करून दिले. हे आव्हान युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 74.3षटकात 8गड्यांच्या बदल्यात 220धावा करून पूर्ण केले. यात आदित्य राजहंसने 42 चेंडूत 8चौकारांसह 41धावा, नीरज जोशीने 24 धावा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80चेंडूत 56धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्रेयस जाधवने नाबाद 49 व मल्हार वंजारी 25 यांनी पाचव्या गड्यासाठी 71 चेंडूत 51 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यानंतर तनिष्क सीतापूरेने नाबाद 49 व, विठ्ठल चौधर 20 यांनी सातव्या गड्यासाठी 180 चेंडूत 57 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीकडून रवींद्र मातेचा(4-20), मोहम्मद आतिशाम (2-35), अली खान(1-25) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर आदित्य राजहंस ठरला.
पूना क्लब मैदानावरील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या दिवशी क्लब ऑफ महाराष्ट्राच्या पहिल्या डावापासून खेळास सुरुवात झाली. काल पहिल्यांदा खेळताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 90.3षटकात सर्वबाद 257 धावा केल्या. याच्या उत्तरात व्हेरॉकच्या रोहित चौधरी(4-63), सोहम जमाले(3-30), टिळक जाधव(2-12)यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 77.4 षटकात सर्वबाद 202 धावावर गारद झाला. यात सौरभ दरेकरने 69चेंडूत 8चौकर व 1षटकारासह 49धावा, जयेश तांबेने 46धावा यांनी चौथ्या गड्यासाठी 148चेंडूत 81धावांची भागीदारी केली. त्यानंतर सईद हमझा 33, स्वप्निल पठाडे 26 यांनी धावा केल्या. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
सामन्याचा निकाल: उपांत्य फेरी:
येवलेवाडी मैदान: पहिला डाव: ब्रिलियंट्स स्पोर्ट्स अकादमी: 45षटकात सर्वबाद 196 धावा वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 39.1षटकात सर्वबाद 153 धावा; ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाची पहिल्या डावात 43 धावांची आघाडी;
दुसरा डाव: ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 53.1षटकात सर्वबाद 176 धावा वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 74.3षटकात 8बाद 220धावा(आदित्य राजहंस 41(42,8×4), श्रेयस जाधव 41(52,5×4,2×6), मल्हार वंजारी 25(55), नीरज जोशी 24(49), तनिष्क सीतापूरे नाबाद 49(135,5×1,1×6), विठ्ठल चौधर 20, रवींद्र मातेचा 4-20,मोहम्मद आतिशाम 2-35, अली खान 1-25); सामनावीर-आदित्य राजहंस; युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघ 2 गडी राखून विजयी;
पूना क्लब मैदान: पहिला डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 90.3षटकात सर्वबाद 257 धावा वि. क्लब ऑफ महाराष्ट्र: 77.4 षटकात सर्वबाद 202 धावा(सौरभ दरेकर 49(69,8×4,1×6), जयेश तांबे 46(174,4×4), सईद हमझा 33(89,4×4), स्वप्निल पठाडे 26(33), रोहित चौधरी 4-63, सोहम जमाले 3-30, टिळक जाधव 2-12); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 55 धावांची आघाडी;
दुसरा डाव: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 25षटकात 4बाद 69धावा(हर्षवर्धन खांडवे नाबाद 45(68,9×4), अंश धूत नाबाद 3, शुभम मेड 2-18, नित्यय लुंकड 1-4,सईद हमझा 1-24 वि.क्लब ऑफ महाराष्ट्र
महत्त्वाच्या बातम्या-
अठरावी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राचा संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार
वाचला ना गडी! पत्नीचा वाढदिवस विसरणे हाफिजला पडले असते महागात; सानियाने केली ‘अशी’ मदत