क्रिकेट जगतातील पहिला टी20 सामना 2004 मध्ये खेळला गेला. तर, पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी 2005 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. 2007 च्या टी20 विश्वचषकानंतर या खेळाची लोकप्रियता वाढली. तसेच सध्या, असंख्य लीग स्पर्धा टी20 स्वरूपात खेळल्या जात आहेत. आता लवकरच इंटरनॅशनल मास्टर्स लीगचे नावही यात समाविष्ट होणार आहे. ज्याचा पहिला हंगाम येत्या 22 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
या मेगा इव्हेंटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिलेले खेळाडू त्यांचा खेळ दाखवताना दिसतील. यामध्ये युवराज सिंग, सचिन तेंडुलकर, जेपी ड्युमिनी आणि श्रीलंकेचा उपुल थरंगा यासारख्या खेळाडूंची नावे आहेत.
दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे की, वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ख्रिस गेल देखील या स्पर्धेत भाग घेणार आहे. त्याच्याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी आणि इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मोंटी पानेसर हेही खेळताना दिसणार आहेत.
🚨 CHRIS GAYLE IS BACK IN CRICKET 🚨
– The Universe Boss, Chris Gayle will be playing in IML T20 for West Indies Masters starting on February 22nd. 🚀 pic.twitter.com/Bu2pCqJXFA
— Johns. (@CricCrazyJohns) February 3, 2025
गेल वेस्ट इंडिज मास्टर्सचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. तर अँटिनी आणि पनेसर आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याबद्दलचा उत्साह शेअर करताना गेल म्हणाला, “मैदानावर परत येणे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणे नेहमीच रोमांचक असते. आयएमएल हे त्या मोठ्या क्षणांना पुन्हा अनुभवण्यासाठी आणि खेळातील काही सर्वोत्तम खेळाडूंसोबत स्टेज शेअर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. मी खेळाडूंची ऊर्जा आणण्यास उत्सुक आहे. या लीगसाठी मी तयार आहे.”
ख्रिस गेलला टी20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज मानले जाते. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो अव्वल स्थानावर आहे. गेलने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 463 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 36.22 च्या सरासरीने 14562 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 22 शतके आणि 88 अर्धशतके ठोकल्या आहेत.
हेही वाचा-
IND vs ENG; रिंकू, हर्षितने नाही तर ‘या’ खेळाडूने जिंकला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणांचे पदक!
भारताच्या शानदार विजयानंतर अमिताभ बच्चनने उडवली इंग्लंडची खिल्ली! व्हायरल पोस्ट एकदा पहाच
IPL 2025; संघाला मोठा धक्का, राॅयल्सचा कर्णधार गंभीर जखमी