आयपीएल 2021 मधील 13 वा सामना मंगळवारी (20 एप्रिल) रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. दिल्लीच्या या विजयात अमित मिश्राने महत्वपूर्ण कामगिरी बजावली. या सामन्यात त्याने मुंबई संघातील प्रमुख फलंदाजांना बाद करून मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. या सामन्यात त्याने 4 षटकांत 24 धावा देऊन 4 बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तो दुसऱ्या नंबरवरती आहे. परंतु अशा महान गोलंदाजावरती एकदा एका महिलेने मारपीट करण्याचा आरोप करून तक्रार नोंदवली होती.
भारतीय संघाच्या या फलंदाजावरती त्याची महिला मित्र दिग्दर्शक वंदना जैनने बेंगळुरूच्या अशोकनगर पोलिस स्टेशनमध्ये चहाची किटली फेकून मारल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बेंगळुरू पोलिसांनी त्याला छेडछाड करण्याच्या आरोपाखाली जेरबंद केले होते.
एकेकाळी तो भारतीय संघाचा सुद्धा गोलंदाज होता. परंतु 2017 मध्ये इंग्लडविरूद्धच्या टी-20 सामन्यात त्याला दुखापत झाली तेव्हापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते की, “भारतीय संघात स्थान देण्याबाबत मी विराट कोहलीशी चर्चा केली होती. परंतु कोहलीने माझ्याकडे दुर्लक्ष केले होते.”
अमित मिश्राने त्याच्या क्रिकेट कारकीर्दमध्ये 22 कसोटी सामन्यात 76, तर 36 एकदिवसीयमध्ये 64 आणि 10 टी-20मध्ये 16 बळी घेतले आहेत. आपल्या आयपीएल कारकीर्दीत त्याने एकूण 152 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 164 बळी मिळवले आहेत. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे. तर मुंबई इंडियन्स मध्ये खेळणारा श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाने 170 बळी घेतल्याने तो अव्वल क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बालपणीपासूनचं टॅलेंटेड! विराट दहावीला असतानाचं बनला होता कर्णधार, हे फोटो पाहून पटेल खात्री
सेहवागने पाहिजे ते माग म्हटले असता मिश्रा म्हणाला होता, ‘फक्त माझी पगार वाढवा’; वाचा तो किस्सा
रविंद्र जडेजाच्या जिवलग ‘वीर’चे झाले निधन, भावनिक पोस्ट शेअर करत दिला निरोप