भारताच्या 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचा कर्णधार राहिलेला उन्मुक्त चंद हा आता बांगलादेश प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी त्याने आपले नाव नोंदवले असून, त्याला कोणता संघ निवडतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झालेला उन्मुक्त भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने जगातील इतर लीग खेळण्यासाठी पात्र ठरतो.
बांगलादेश प्रीमियर लीगच्या नवव्या हंगामासाठी खेळाडूंची नोंदणी सध्या सुरू आहे. 23 नोव्हेंबर रोजी स्पर्धेसाठी खेळाडूंचे ड्राफ्ट केले जातील. स्पर्धेच्या जवळपास दोन महिने आधी खेळाडूंचे ड्राफ्ट केले जातात. यासाठी भारत अंडर नाईन्टीन तसेच इंडिया ए संघाचे नेतृत्व केलेल्या उन्मुक्त चंद याने नोंदणी केली आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूला विदेशातील लीग खेळण्याचे परवानगी नाही. मात्र, चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने तो जगातील सर्व लीग खेळू शकतो.
सध्या चंद अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. पुढील वर्षी तो अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी देखील पात्र होईल. त्याने अमेरिकन क्रिकेट सोबत करार केल्याने त्याला अमेरिकन खेळाडू म्हणून इतर लीगमध्ये खेळण्याची मुभा आहे. त्यामुळेच मागील वर्षी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये तो मेलबर्न रेनेगेड्स संघासाठी खेळताना दिसलेला. तसेच सीपीएलमध्येही त्याने सहभाग नोंदवलेला. सध्या तो अमेरिकेत मायनर लीग क्रिकेट खेळतो. पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये तो एका संघाचे नेतृत्व करतानाही दिसू शकतो.
दिल्लीचा रहिवासी असलेल्या उन्मुक्तने त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला 2012 अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर इंडिया ए संघाचे देखील त्याने नेतृत्व केले. आयपीएलमध्ये मुंबई, दिल्ली व राजस्थान या संघांकडून खेळताना त्याला विशेष छाप पाडत आली नाही. त्यानंतर त्याची कामगिरी घसरल्याने दिल्ली रणजी संघाने देखील त्याला डच्चू दिला. एक वर्ष उत्तराखंड संघासाठी खेळल्यानंतर त्याने 2020 मध्ये भारतीय क्रिकेटला रामराम ठोकत ऑस्ट्रेलियाचा मार्ग धरला होता.
(Unmukt Chand Register For Bangladesh Premier League Draft)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यूएईच्या गोलंदाजाने केले असे काही कृत्य, ज्यामुळे नेपाळ संघाला मिळाल्या फुकटच्या 5 धावा
भारताची फलंदाजी जुन्या पद्धतीची, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान






