महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा शेवटाकडे जात आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी संपली आहे. आता शुक्रवारी (दि. 24 मार्च) स्पर्धेतील एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर 7.30 वाजता मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ संघात एलिमिनेटर सामना सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक यूपी संघाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ संघातील एलिमिनेटर सामन्यात यूपी संघामध्ये काही बदल आहेत. संघात ग्रेस हॅरिस हिचे पुनरागमन झाले आहे. तसेच, शबनीम इस्माईल ही संघाबाहेर पडली आहे. दुसरीकडे, मुंबई संघात कोणताही बदल झाला नाहीये.
https://twitter.com/wplt20/status/1639259422709907457
स्पर्धेतील संघांची कामगिरी
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेत मुंबई इंडियन्स महिला संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत, तर उर्वरित 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तसेच, दुसरीकडे, यूपी वॉरियर्झ संघाने 8 सामन्यांपैकी 4 जिंकले आहेत, तर 4 सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. (UP Warriorz opt to bowl against Mumbai Indians Women in wpl 2023 eliminator match)
एलिमिनेटर सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स महिला (Mumbai Indians Women)
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इझी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक
यूपी वॉरियर्झ (UP Warriorz)
अलिसा हिली (कर्णधार/यष्टीरक्षक), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्शवी चोप्रा, सोप्पधंडी यशश्री
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिलं प्रेम सोडून ‘तिने’ धरला क्रिकेटचा हात, WPL स्पर्धेत गुगलीने दिग्गज खेळाडूंना देतेय त्रास
यह मुंबई मेरी जान! एमआयचे नवे ऍंथम रिलीज, दाखवली शहराची ओळख, पाहा व्हिडिओ






