प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या ९ तारखेला प्रो कबड्डीचा १०४ वा सामना तमिळ थलाईव्हाज आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. या सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत तमिळ थलाईव्हाज २२-२० ने आघाडीवर होते. पण पुढे यूपी योद्धांनी सामन्यात पुनरागमन करत ४१-३९ने हा सामना जिंकला आहे.
A fierce display as we lead at the break! 🟡#CHEvUP #IdhuNammaAatam #Mannukkaga #vivoProKabaddi #SuperhitPanga pic.twitter.com/CPnUxhFMOL
— Tamil Thalaivas (@tamilthalaivas) February 9, 2022
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १७ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १२ सामने जिंकत ६५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ हरियाणा स्टिलर्स संघ ५८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दबंग दिल्ली (५७ गुण), बेंगलुरू बुल्स (५५ गुण) आणि पिंक पँथर्स (५१ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय महिलांची हाराकिरी, न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव टी२०त १८ धावांनी पराभूत
रिषभने दुसऱ्या वनडेत उगाच दिली नाही सलामी, कर्णधार आणि प्रशिक्षकाने खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय
दुसऱ्या वनडेला स्पेशल पाहुण्यांची उपस्थिती, पण रोहित- विराटशी नाही होऊ शकली ‘युवा ब्रिगेड’ची भेट