---Advertisement---

भर सामन्यात बेशुद्ध पडल्या होत्या विंडिजच्या २ महिला क्रिकेटर, रुग्णालयातून आली मोठी अपडेट

On: रविवार, जुलै 4, 2021 7:54 AM
---Advertisement---

पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघामध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज महिला संघाने ७ धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. मात्र या सामन्यात अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने वेस्ट इंडीज संघातील २ खेळाडू एकापाठोपाठ एक चक्कर येऊन मैदानात पडले. खाली पडताच त्या बेशुद्धही झाल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेटकडून दिली गेली माहिती
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून या दोन्ही खेळाडूंच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, आलीया एलिन व चेडीएन नेशन या दोघींची देखील प्रकृती स्थिर आहे. त्या दोघीही शुद्धीवर आल्या असून डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष देऊन आहेत.’

संघाचे मुख्य प्रशिक्षक कर्टनी वॉल्श त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, “दोन प्रमुख खेळाडू हॉस्पिटलमध्ये असताना सामना खेळणे सोपे नसते. आमच्या संघाने धैर्य दाखवले. हा विजय त्या दोघींना समर्पित आहे.”

पाकिस्तान संघाची कर्णधार जकारिया खान हिनेदेखील सामन्यानंतर या घटनेविषयी बोलताना म्हटले, “आमचा संपूर्ण संघ आलीया व नेशन त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्या लवकर बऱ्या हव्यात अशी आमची इच्छा आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात त्या उतरतील अशी अपेक्षा ठेवूयात.” दोन राखीव क्षेत्ररक्षकांसह वेस्ट इंडीजने हा सामना पूर्ण केला होता.

वेस्ट इंडीजचा शानदार विजय
वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना १२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाच्या डावात पावसाने अडथळा निर्माण केला होता. पाऊस येईपर्यंत पाकिस्तान संघाने १८ षटकात ६ गडी बाद १०३ धावा केल्या होत्या. त्यामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने ७ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

स्म्रिती मंधानाने बाउंड्रीजवळ टिपला अप्रतिम झेल, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुपरवुमन’

थरारक सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय, मितालीची ‘रेकॉर्डब्रेक’ नाबाद खेळी, स्नेह राणाची पुन्हा चमक

पृथ्वी शॉ इंग्लंडला गेला तर कोण असेल धवनचा सलामी जोडीदार? ‘ही’ ३ नावे आहेत शर्यतीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---