भारतीय संघाची आक्रमक फलंदाज स्म्रिती मंधाना हिने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. आक्रमक आणि विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाणारी स्म्रिती मंधाना मी एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. याचा नमुना ती नेहमीच मैदानावर देत असते. अशातच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ या दोन्ही संघामध्ये पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात स्म्रिती मंधानाने डाईव्ह मारून डोळ्याचे पारणे फेडणारा झेल टिपला आहे. तिच्या या अप्रतिम झेलमुळे नेटली सिवर ४९ धावांची खेळी करत माघारी परतली होती. (Smriti mandhana catch video went viral on social media)
पहिल्या डावातील ३८ व्या षटकात दीप्ती शर्मा गोलंदाजी करण्यासाठी आली होती. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिवरने मिड विकेटच्या दिशेने हवेत शॉट खेळला होता. असे भासू लागले होते की चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर जाईल. परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेली स्म्रिती मंधाना धावत आली आणि डाईव्ह मारत अप्रतिम झेल टिपला. स्म्रिती मंधानाच्या या झेलमुळे इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
WHAT A CATCH ????
Smriti Mandhana ????????#ENGvIND pic.twitter.com/xjrNSByrJ6— Akash (@im_akash196) July 3, 2021
इंग्लंड संघाला २१९ धावा करण्यात आले यश
या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा सामना ४७-४७ षटकांचा खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून सिवरने सर्वाधिक ४९ धावा तर कर्णधार हिदर नाईटने ४६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला सर्वबाद २१९ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार मिताली राजने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर स्म्रिती मंधानाने ४९ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
थरारक सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय, मितालीची ‘रेकॉर्डब्रेक’ नाबाद खेळी, स्नेह राणाची पुन्हा चमक
पृथ्वी शॉ इंग्लंडला गेला तर कोण असेल धवनचा सलामी जोडीदार? ‘ही’ ३ नावे आहेत शर्यतीत
ओली रॉबिन्सनच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा, ८ सामन्यांची बंदी असूनही भारताविरुद्ध खेळणार






