ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला. ही मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने आयसीसी टी-20 क्रमवारीत त्यांचा पहिला क्रमांक कायम राखला आहे. संघाकडे सध्या 268 गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडच्या तुलनेत भारताने 7 गुणांची आघाडी घेतली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी हा भारत दौरा महागात पडला आहे.
सध्या भारतीय संघ आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडकडे 261 गुण आहेत. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्या क्रमांकावर कायम आहे, पण त्यांना एका गुणाचे नुकसान नक्कीच झाले आहे. पाचव्या क्रमांकावरील इंग्लंडपेक्षा ऑस्ट्रेलियाकडे फक्त दोन गुण कमी आहे. न्यूझीलंड 252 आणि ऑस्ट्रेलिया 250 गुणांसह अनुक्रमे पाच आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.
क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडकडे टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या जवळ पोहोचण्याची संधी आहे. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 7 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेत दोन्ही संघ 2-2 अशा बरोबरीवर आहेत. पाकिस्तान सध्या क्रमवारीत 258 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ तितक्याच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धचे राहिलेले तीन सामने जिंकून पाकिस्तान संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका देखील भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत ही कामगिरी करू शकतो. टी-20 क्रमवारीतील इतरसंघांचा विचार केला, तर वेस्ट इंडीज सातव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे 8, 9 आणि 10 व्या क्रमांकावर आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या टी-20 सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या नुकसानावर 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघासाठी विराट कोहलीने 63, तर सूर्यकुमार यादवने 69 धावांची वादळी खेळी केली आणि विजय मिळवून दिला. भारताने 19.4 षटकात 4 विकेट्सच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले आणि मालिका देखील नावावर केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
ऑस्ट्रेलियानंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेचा घाम काढणार! पाहा वेळापत्रक आणि हेड-टू-हेड रेकॉर्ड्स
IND vs AUS | गोलंदाज नाही करू शकले रोहितला खुश, मालिका जिंकल्यानंतर कर्णधार म्हणाला…