बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्या रविवार, 30 ऑक्टोबर रोजी रोमांचक लढत पाहायला मिळाली. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा 30 वा सामना होता, जो ब्रिसबेनमध्ये खेळला गेला. उभय संघांतील हा सामना बांगलादेशने अवघ्या तीन धावांनी नावावर केला आणि गुणतालिकेत स्वतःचे स्थान देखील भक्कम केले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला मात्र नुकसान सोसावे लागेल आहे. बांगलादेश आता सुपर 12 फेरीच्या ग्रुप दोनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये झिम्बाब्वेने बांगलादेशने 7 विकेट्सच्या नुकसानावर 150 धावा केल्या. प्रत्युत्तरा झिम्बाब्वे संघ मात्र 20 षटकांमध्ये 8 विकेट्सच्या नुकसानावर 147 धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी झिम्बाब्वेला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेश संघ या विजयानंतर ग्रुप दोनच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यांच्याकडे सध्या चार गुण आहेत. बांगलादेशने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यातील दोन सामने जिंकले आहेत. बांगलादेशच्या रन रेटचा विचार केला, तर ते सध्या 1.533 एवढे आहे.
दक्षिण आफ्रिका संघ याआधी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता. पण आता बांगलादेशने त्यांची जागा काबीज केली आहे. आफ्रिकी संघाने खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे. आफ्रिकी संघाचा पहिला सामना पावसामुळे रक्क करावा लागला होता. रद्द झालेल्या सामन्याचा एक, तर जिंकलेल्या सामन्याचे दोन गुण आफ्रिकी संघाला मिळाले आहेत. यादीत पहिल्या क्रमांकावर भारत आहे. भारताने विश्वचषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध, तर दुसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध जिंकला आहे. भारताकडे सध्या एकूण चार गुण आहेत आणि संघाचा रन रेट 1.425 आहे.
झिम्बाब्वे संघाचे विश्वचषकातील प्रदर्शन आतापर्यंत चांगले राहिले आहे. त्यांनी तीन सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला पराभव स्वीकारला आहे. तर त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यानंतर पाकिस्तान आणि नेदरलँड्स गुणतालिकेत अनुक्रमे पाच आणि सहा क्रमांकावर आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतच सरस! वर्ल्डकपमध्ये चकित करणारी कामगिरी, पाहा भन्नाट आकडेवारी
‘ड्युरासेल’ म्हणून ओळखले जाणारे कर्टनी वॉल्श