---Advertisement---

फुटलं ना डोकं! सीमारेषेवरून क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू थेट पंचाच्या डोक्यात, व्हिडिओ पाहाच

On: रविवार, नोव्हेंबर 28, 2021 1:16 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार संपल्यानंतर आता आणखी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. अबू धाबीमध्ये टी१० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहेत. तसेच या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात असा काही प्रकार घडत आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. असाच काहीसा प्रकार चेन्नई ब्रेव्स आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला आहे.

तर झाले असे की, नॉर्दर्न वॉरियर्स संघाची फलंदाजी सुरू असताना, ५ व्या षटकात फलंदाजाने शॉट खेळला. त्यावेळी क्षेत्ररक्षकाने थ्रो करत असताना तो चेंडू पंच अलीम दर यांच्या डोक्याला लागला. त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते स्वतःचा बचाव करू शकले नाही. मात्र मोठी दुर्घटना होता होता राहिली. अलीम दर वेदनेने कळवळत असताना नॉर्दर्न वॉरियर्स संघाचे फिजिओ मैदानात आले आणि त्यांनी त्यांची तपासणी केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

यासह या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस देखील पाहायला मिळाला. नॉर्दर्न वॉरियर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केनार लुईस आणि मोईन अली यांनी अवघ्या ६ षटकात १०६ धावांची भागीदारी केली. दोघांनी मिळून ८ षटकार मारले. नॉर्दर्न वॉरियर्स संघाला प्रथम फलंदाजी करताना १० षटक अखेर १५२ धावा करण्यात यश आले होते.

https://twitter.com/staycricket/status/1463577803043979267?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463577803043979267%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-42139556942056274096.ampproject.net%2F2111060251009%2Fframe.html

या धावांचा पाठलाग करताना चेन्नई ब्रेव्स संघाकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक ३४ धावा केल्या, तर रवी बोपाराने ३० धावांचे योगदान दिले होते. परंतु, कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ज्यामुळे चेन्नई ब्रेव्स संघाला अवघ्या १३३ धावा करण्यात यश आले. हा सामना नॉर्दर्न वॉरियर्स संघाने १९ धावांनी आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून बाहेर, रचानोक इंतानोनने सेमीफायनलमध्ये केले पराभूत

आता अश्विनची नजर दोन भारतीय दिग्गजांच्या विक्रमावर, ‘हा’ कारनामा करण्यापासून २ पावले दूर

न्यूझीलंडचा घाम काढणाऱ्या अक्षर पटेलने ‘लिमिटेड ओव्हर क्रिकेटर’ म्हणणाऱ्यांना दिले जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---