आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत आपल्याला फलंदाजंकडून आक्रमक बँटिग पहायला मिळाली नसली तरी, या स्पर्धेतील एका फलंदाजाने विश्वविक्रम केला आहे. एस्टोनियाचा फलंदाज साहिल चौहानने 17 जून रोजी एपिस्कोपी येथे यजमान सायप्रस संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये केवळ 27 चेंडूत सर्वात जलद टी20 शतकाचा विक्रम केला आहे. या वादळी खेळीमध्ये दरम्याने त्याने सर्वाधिक 18 षटकार मारण्याचा देखील विक्रम केला.
साहिल चाैहाने सर्वात जलद टी20 शतक ठोकणारा यान निकोल लॉफ्टी ईटनटचा विश्वविक्रम मोडित काडला आहे. यान-निकोलने 33 चेंडूत शतक ठोकले होते. त्याचा हा विक्रम चार महिन्यांपर्यंतच टिकला. आयपीएल 2013 मध्ये ख्रिस गेलने 30 चेंडूत शतक ठोकले होते. तो ही विक्रम साहिल चाैहाने मागे सोडले आहे.
🤩 Fastest Men’s T20I hundred
🔥 Most sixes in a Men’s T20I knockEstonia’s Sahil Chauhan shattered a few records during his innings against Cyprus 💥
Read on ➡️ https://t.co/31502UVMXw pic.twitter.com/Yry1p39eRO
— ICC (@ICC) June 17, 2024
टी20 सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत चौहान अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सहा सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेच्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले, जे दोन्ही सामने एस्टोनियाने जिंकले. एस्टोनियाने पहिला सामना सायप्रसचा स्कोअर सात गड्यांच्या मोबदल्यात 195 धावांवर मागे टाकत जिंकला. पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाल्यानंतर चौहानने पुढच्या सामन्यात आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले.
पथ्रम फलंदाजी करताना सायप्रसने सात विकेट्स गमावून 191 धावा केल्या प्रत्युत्तरात एस्टोनियाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाचे दोन्ही फलंदाज पहिल्या दोन षटकात तंबूत परतले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या चाैहानने सायप्रसच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला, त्याने 351.21 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी करणारा साहिलने या खेळीसह दुसरा इतिहास घडवला. साहिलने सायप्रसच्या गोलंदाजांविरुद्ध 141 धावांच्या नाबाद खेळीत 18 षटकार ठोकले. गेलचा विक्रम मोडण्यापासून तो एक षटकार दूर होता. विंडीजचा झंझावाती फलंदाज गेलने 2017 मध्ये रंगपूरकडून खेळताना मीरपूरमध्ये डायनामाइड्सविरुद्ध 146 धावांच्या नाबाद खेळीत 18 षटकार ठोकले होते.
महत्तवाच्या बातम्या-
ट्रेंट बोल्टचा टी20 विश्वचषकाला निरोप! अखेरच्या सामन्यात केली जबरदस्त गोलंदाजी
टीम इंडियाच्या नव्या कोचसाठी दिग्गज खेळाडूची आज मुलाखत, बीसीसीआयला मिळाला एकच अर्ज!
यजमान वेस्ट इंडिजची दादागिरी, अफगाणिस्तानवर 104 धावांनी मिळवला शानदार विजय