भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील वाद नवा नाही. पंत आणि उर्वशी रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर पंतने तिच्यासोबत ब्रेकअप करत तिला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ब्लॉक केले असल्याच्या बातम्या आहेत. अशात आता पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत पंतचे नाव घेतल्याने त्याने उर्वशीचे इंस्टाग्राम स्टोरीद्वारे कान टोचले होते. यानंतर आता उर्वशीनेही त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
उर्वशी (Urvashi Rautela) हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जे वक्तव्य केले, त्यातून असे समोर आले होते की, पंत तिला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता. पण तिला वेळ नसल्यामुळे पंतसोबत तिची भेट झाली नाही. उर्वशीने बोलताना रिषभ पंत (Rishabh Pant) याचे नाव जरी घेतले नसले तरी, नेटकऱ्यांनी काढायचा तो अर्थ काढला आहे. दरम्यान, रिषभ पंतनेही तिच्या या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिल्याचे समजते. पंतच्या इंस्टाग्राम स्टोरिचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या मते पंतने काही मिनिटांमध्येच ही स्टोरी डिलिट केली.
Rishabh Pant Latest Story……. He Deleted It After 7 Minutes……#RishabhPant #Pant #UrvashiRautela #WhatsApp pic.twitter.com/wMWk82n5at
— Ps Virat Kohli Fan (@ps_viratkohli18) August 10, 2022
पंतने या स्टोरीमध्ये लिहिले होते की, “किती मजेशीर बाब आहे की, काही लोक लोकप्रियतेसाठी मुलाखतीत खोटे बोलतात, जेणेकरून हे हेडलाईमध्ये येतील. हे खूप वाईट आहे की, हे लोक प्रसिद्धीसाठी किती भुकेले आहेत. देव त्यांना सुखी ठेवो. माझा पिछा सोड ताई! खोटं बोलण्यालाही सीमा असतात.” असे सांगितले जात आहे की, पंतने ही स्टोरी सात मिनिटांनंतर डिलिट केली होती.
Chotu bhaiyaa should play bat ball 🏏. Main koyi munni nahi hoon badnam hone with young kiddo darling tere liyee
#Rakshabandhan Mubarak ho #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl #love #UrvashiRautela #UR1 pic.twitter.com/AA3APRFViY— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) August 11, 2022
आता पंतच्या या प्रतिक्रियेवर उर्वशीनेही प्रत्युत्तर दिले आहे. उर्वशीने पंतच्या इंस्टाग्राम स्टोरीचा फोटो ट्वीटमध्ये जोडत त्याला छोटू भैया म्हटले आहे. तसेच तिने पंतला क्रिकेट खेळण्याचाही सल्ला दिला आहे. तिने ट्वीट करत लिहिले की, “छोटू भैयाने बॅट-बॉल खेळायला पाहिजे. मी कोणी मुन्नी नाही, जी तुझ्यासारख्या तरुण बालकासाठी बदनाम होईल.” याबरोबरच तिने हॅशटॅगमध्ये रिषभ पंत छोटू भैया असेही लिहिले आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहची दुखापत वाढवतेय भारतीय संघाची चिंता, टी२० विश्वचषकाबाबत गंभीर माहिती पुढे!
मांजरेकरांनी पुन्हा काढली जडेजाची खोड; म्हणाले, “त्याला स्वतःलाच…”
टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी यजमान झिम्बाब्वे ‘रेडी’; निवडला तगडा संघ