दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने ४ ऑक्टोबर रोजी आपला २४ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्ली संघाने चेन्नई सुपर किंग्सचा ३ विकेट्सने पराभव केला आणि त्याला वाढदिवसाची सुंदर भेटही दिली. एवढेच नव्हे तर पंतच्या वाढदिवशी चाहत्यांनी आणि क्रिकेटपटूंनीही ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या. पण दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही पंतला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण शुभेच्छा दिल्यानंतर ती खूप ट्रोल झाली.
जेव्हा ४ ऑक्टोबरच्या रात्री दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा पराभव केला, तेव्हा सोशल नेटवर्किंग साइट्स व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक जगभर ठप्प झाले होते. अशा परिस्थितीत उर्वशीने ट्विटरवर पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण उर्वशीला दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास विलंब झाला होता. १२ वाजल्यानंतर तारीख बदलली असताना उर्वशीने पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. म्हणजेच उर्वशीने ४ ऐवजी ५ ऑक्टोबर रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर उर्वशीला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली.
@RishabhPant17 happy birthday
— URVASHI RAUTELA???????? (@UrvashiRautela) October 4, 2021
एका युजरने ट्विट करून लिहिले की, ‘कृपया रिषभ पंतला त्रास देऊ नका, तुम्ही त्याला विश्वचषकानंतर मेसेज करा.’ याशिवाय, चाहत्यांनी उर्वशीला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, तुला शुभेच्छा देण्यास उशीर झाला आहे. सोशल मीडियावर उर्वशीने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा चर्चेचा विषय बनला आहे.
@RishabhPant17 be like :- humko maaf krde aap ???????????? pic.twitter.com/yXPAV5IJzg
— l (@vikiiiioooo) October 5, 2021
https://twitter.com/exhaustednd/status/1445111022398803978
Bas meri maa. Idhar bhi block khayegi kya pic.twitter.com/YfoqpA5qzU
— ???????????????? (@Simply_diya) October 5, 2021
here is the girl want to create something by wishing ????
— vamsi (@vamc_i) October 4, 2021
Whatsapp down so she just sent message through Twitter.
Kudos to @Twitter ????????????????
— YOGENDRA SINGH DIKHIT (@ItsDikhit) October 4, 2021
When twitter also knows pic.twitter.com/zqkCqRY8cZ
— Indian (@CantTellRealNa1) October 5, 2021
https://twitter.com/gabbarmanna/status/1445294085825187843
Rishabh be like: pic.twitter.com/oGfout3C4L
— Dikshit Rohit (@DikshitRht) October 5, 2021
Hath jod kr guzarish hai @UrvashiRautela wc se phle dur rhye @RishabhPant17 bhai se .. ????#HappyBirthdayRishabhPant pic.twitter.com/6dRBwYzhGv
— Anupam Rai (@sarcasm_rai) October 5, 2021
https://twitter.com/Being__Radhe__/status/1445117374869372940
Rishabh Pant be like : pic.twitter.com/3HqmLy7Y8A
— Sleep (@insleep) October 5, 2021
दुसरीकडे, सलग तिसऱ्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. २०१९ मध्ये संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता, तर २०२० च्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आणि मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाला होता. यावेळीही दिल्लीच्या संघाने अप्रतिम खेळ दाखवत प्लेऑफमध्ये अव्वल स्थान गाठले आहे.
आयपीएल २०२१ पर्यंत आत्तापर्यंत तीन संघ प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत, ज्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आहेत. त्यामुळे आता चौथ्या संघासाठी अन्य संघांमध्ये चूरस आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट ‘रनमशीन’ असेल तर रोहित ठरतोय भारताचा ‘सिक्सरमशीन’! ४०० वा षटकार मारत केलाय मोठा पराक्रम





