बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला सध्या युएईत सुरू असलेल्या आशिया चषक 2022 च्या सामन्यांमध्ये दिसत आहे. ती भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या दोन्हीही सामन्यांमध्ये स्टेडियममध्ये भारतीय संघाला चीयर करताना दिसली. भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत याच्यासोबत तिचे नाव जोडले जात होते. त्याला चीयर करण्यासाठीच ती दुबईच्या स्टेडियममध्ये आली असल्याची चर्चा होती. परंतु आता उर्वशीने स्वत:च या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
उर्वशीने (Urvashi Rautela) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपली स्टेडियममधील व्हिडिओ क्लिप पाकिस्तानच्या क्रिकेटपटूसोबत जोडली आहे. यानंतर क्रिकेटप्रेमी वेगवेगळे अंदाज वर्तवताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि भारतीय यष्टीरक्षक पंत (Rishabh Pant) यांमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू होता. त्यानंतर भारताच्या सामन्यांवेळी स्टेडियममध्ये आल्याने उर्वशी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. यादरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. या रीलमध्ये उर्वशी पंत नव्हे तर पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाहसोबत (Naseem Shah) दिसत आहे.
आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती दुबईच्या स्टेडियममध्ये स्टँड्समध्ये बसून सामना पाहाताना दिसतेय. उर्वशीला मोठ्या स्क्रिनवर पाहून पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाह लाजताना दिसत आहे. नसीमला लाजलेला पाहून उर्वशीही लाजून लालेलाल होतेय.
https://twitter.com/Momminahh/status/1567184082571763712?s=20&t=bLtzgqlf_HoGKABjkjV_zg
मात्र उर्वशीला हा व्हिडिओ शेअर करणे चांगलेच महागात पडले. अनेकांनी तिला या व्हिडिओवरून ट्रोल केले. त्यामुळे उर्वशीने काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला आहे. काही चाहत्यांनी तर उर्वशीचे नसीमसोबत नाव जोडले आहे. तर काहींनी तो अजून लहान आहे, त्याला तरी सोड, असा सल्ला देत उर्वशीला ट्रोल केले आहे.
https://twitter.com/Kingofcricket0/status/1567145348681850888?s=20&t=e7PaEkY1MmU5Jrc44vyIeQ
https://twitter.com/fzk_94/status/1567115441750921218?s=20&t=e7PaEkY1MmU5Jrc44vyIeQ
दरम्यान भारतीय संघाने आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले आहेत. साखळी फेरी सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते. तर या पराभवाचा वचपा पाकिस्तानने सुपर-4 फेरीत काढला. सुपर-4 फेरीत पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! आयपीएल खेळलेल्या क्रिकेटपटूवर बला’त्काराचा आरोप, 17 वर्षीय मुलीने दाखल केली तक्रार
हार्दिक, रिषभमध्ये फलंदाजी क्रमावरून कंफ्यूजन, शेवटी पंतचा पडला चेहरा; पाहा काय झाले?
ASIA CUP: ‘उमरान-दिपक संघाबाहेर अन् कार्तिकला संधी न मिळणे सगळं निराशाजनक!’ माजी दिग्गजाने साधलाय निशाणा





